आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

नागपूर:डॉक्टर पती-पत्नीची दोन मुलांसह आत्महत्या, उपराजधानीत खळबळ

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जगनाडे लेआऊटमध्ये राहणाऱ्या डॉक्टर पतीपत्नींनी आपल्या दोन मुलांसह आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना येथे उघडकीस आली आहे. या मागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. डॉ. धीरज राणे (४५) व डॉ. सुषमा राणे (४०) असे या दाम्पत्याचे नाव असून ध्रुव (वय ११) व वण्या (वय ५) अशी मुलांची नावे आहे. डॉ. सुषमा राणे यांनी गळफास घेतला तर इतर तिघांचे मृतदेह बेडरूममधील पलंगावर पडून होते. त्यांच्याकडे एक सुसाईड नोट आढळून आली आहे.

राणे कुटुंब त्यांच्या आईसह कोराडी जवळ ओमनगर येथे राहाते. डॉ. धीरज हे रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात विभाग प्रमुख होते तर डॉ. सुषमा या अवंती हॉस्पीटलमध्ये कार्यरत होत्या. डॉ. सुषमा यांनी गळफास लावून आत्महत्या केली आहे तर उरलेल्या तिघांचे मृतदेह बेडरूममधील पलंगावर आढळून आले. घरी त्यांच्या वयोवृद्ध आई असून रात्री १२ च्या सुमारास त्यांचे आपसात बोलणे झाले असल्याचे समजते. सकाळपासून त्यांच्या खोलीचे दार ठोठावूनही प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडला असता ही घटना समोर आली.