आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाॅ. राणी बंग यांच्या प्रकृतीत सुधारणा:डॉक्टर म्हणाले, 2 महिन्यात होतील बऱ्या

नागपूर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ‘महाराष्ट्र भूषण’ डाॅ. राणी बंग यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसेस, सिम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर अतिदक्षता कक्षात उपचार सुरू आहे. तसेच डाॅ. राणी बंग यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

संपूर्ण महाराष्ट्राने त्यांच्या प्रकृतीसाठी शुभेच्छांचा वर्षाव करताना प्रार्थनाही केली. त्या बद्दल डाॅ. अभय बंग यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. डाॅ. राणी बंग यांच्या उजव्या अंगाला अर्धांगवायू झाला आहे. मात्र डाॅक्टरांचा सल्ला आणि उपचाराने दोन महिन्यात त्या बऱ्या होतील असे डाॅ. अभय बंग यांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार चार दिवसांपूर्वी वर्धा येथील एका कार्यक्रमात डाॅ. राणी बंग सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांची प्रकृती बिघडली. मेंदूतील रक्तस्रावामुळे त्यांच्यावर अतिदक्षता कक्षात उपचार करण्यात येत होते. त्यातून त्या आता बऱ्या झाल्या आहे.

एमजीआयएमएस सेवाग्राम येथे डॉ. जाजू आणि डॉ. कलंत्री यांनी प्राथमिक उपचार केल्या नंतर त्यांच्यावर डॉ. काबरा (न्यूरोलॉजिस्ट), डॉ. अंकिता राजपूत (इंटेन्सिव्हिस्ट) यांच्या नेतृत्वाखालील टीमद्वारे सीआयआयएमएस, नागपूरच्या आयसीयूमध्ये उपचार केले जात आहे. तिच्यासाठी पाठिंबा, शुभेच्छा आणि प्रार्थनांचा वर्षाव पाहून आम्ही भारावून गेलो आहोत. आम्ही सर्वांचे ऋणी आहोत. ती एक सेनानी आहे. तिच्याकडे जीवनाची उत्कंठा आणि सेवा करण्याची तळमळ आहे. आम्ही आशा करतो आणि प्रार्थना करतो की, या सगळ्यामुळे ती पूर्णपणे बरी होईल, असे त्यांचे सुपूत्र डाॅ. आनंद बंग यांनी दोन तीन दिवसांपूर्वी म्हटले होते. ते खरे झाले आहे. महाराष्ट्राची प्रार्थना फळाला आली आहे.

राणी बंग यांनी लिहीलेली गोईण व कानोसा ही पुस्तके मार्गदर्शक ठरली आहेत. डॉ. राणी व अभय बंग यांना यापूर्वी महाराष्ट्रभूषण जसेच टाईमस् साप्ताहिकाचा ग्लोबल हेल्थ हिरोज हे पुरस्कारांनी सन्मानित कारण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सर्च या सामाजिक संस्थेच्या संस्थापक व सहसंचालिका आहे. “तारुण्यभान:- तरुण-तरुणींसाठी ‘प्रेम, लैंगिकता व प्रजननविषयक’ शास्त्रीय ज्ञान आणि सामाजिक भान” हा कार्यक्रम लोकप्रिय आहे. लैंगिकता या विषयाबद्दल सर्वांच्याच, विशेषतः तरुण पिढीच्या मनात स्वाभाविक कुतूहल असतं. डॉ. राणी बंग व डॉ. अभय बंग यांच्या ‘सर्च’ (गडचिरोली) या संस्थेने तरुण-तरुणींना, पालकांना व शिक्षकांना लैंगिकतेविषयी वैज्ञानिक माहिती देऊन निकोप व प्रगल्भ दृष्टीकोन विकसित करण्यासाठी 1995 साली ‘तारुण्यभान’ हा उपक्रम सुरु केला.

बातम्या आणखी आहेत...