आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशस्वी ऑपरेशन:डाॅक्टरांनी शस्त्रक्रिया करून पित्ताशयातील लहान-मोठे 1 हजार 426 खडे काढले

गोंदिया23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोंदिया येथील बी.जे. हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे प्रमुख तथा तज्ज्ञ सर्जन डॉ. विकास जैन यांनी तीव्र पोटदुखीने त्रस्त असलेल्या महिलेच्या पित्ताशयावर यशस्वी ऑपरेशन करून पित्ताशयातील सुमारे १ हजार ४२६ लहान-मोठे खडे काढले आहेत.उल्लेखनीय आहे की, पित्ताशयात कोलेस्टेरॉल जमा झाल्यामुळे किंवा कडक झाल्यामुळे खडे निर्माण झाले होते.आणि त्यासोबतच अन्न पचण्यातही समस्या निर्माण होती. अपचन, आंबट ढेकर येणे, पोटात जड होणे, उलट्या होणे, घाम येणे यासारख्या समस्यांनी त्रस्त असलेल्या महिलेच्या पोटात असह्य वेदना होत होत्या आणि महिला रुग्णाच्या पित्ताशयाचा आकार सामान्यापेक्षा अनेक पटींनी वाढला होता. रुग्णाची अल्ट्रासाऊंड, सीटीस्कॅन अशी तपासणी केली असता पित्ताशयात असंख्य खडे असल्याचे समोर आले. ते काढण्यासाठी वेळेवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील मलाजखंड तालुक्यातील बोडा गावातील झुरनबाई मडावी या ५५ ​​वर्षीय महिलेवर जटिल आणि आव्हानात्मक शस्त्रक्रिया करण्यात आली. महिलेच्या शरीरातून एवढ्या मोठ्या प्रमाणात खडे काढणे ही पहिलीच घटना असू शकते.त्यामुळे या यशस्वी शस्त्रक्रियेसाठी डॉ.विकास जैन यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...