आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुत्रीवरच बलात्कार:विकृताकडून लैंगिक अत्याचार, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले, पशुक्रुरता कायद्यान्वये गुन्हा दाखल

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिनिधीक फोटो - Divya Marathi
प्रतिनिधीक फोटो

नागपूर येथील हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत विकृताने कुत्रीवरच बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. हुडकेश्वर पोलिस ठाण्यात या प्रकरणी पशुक्रुरता कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

देवेंद्र गणपत भगत (४०) हा शिवम ट्रेडर्सच्या समोरील मोकळ्या जागेत (शाहू नगर चौक, मानेवाडा बेसा रोड, हुडकेश्वर) या ठिकाणी राहतो. व तेथेच हातमजुरीचे काम करतो. तो मूळचा मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील कोथुलना येथील रहिवासी आहे. बेसा येथील उद्यानात फिरणाऱ्या एका कुत्रीवर देवेंद्र भगत याने बलात्कार केला.

प्रतीक टाकळकरच्या तक्रारीनुसार, भिवसेन टाकळकर यांनी घरी मादी श्वान पाळली होती. भगत कुत्रीला घरात घेऊन दार बंद करून घ्यायचा आणि थोड्या वेळाने बाहेर सोडायचा. त्यानंतर तो भगतवर लक्ष ठेवू लागला. त्यानंतर परत असा प्रकार लक्षात आल्यावर त्याने दाराच्या चौकटीतून पाहिल्यावर भगत त्या श्वानासोबत लैंगिक कृती करत असल्याचे लक्षात आले होते. त्यानंतर टाकळकर यांनी तक्रार दिल्यानंतर याप्रकरणी गुन्हा नाेंदवण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...