आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
प्रेमात आडकाठी असलेली प्रेयसीची आजी व तिच्या दहा वर्षीय भावाला प्रियकराने गळा चिरून ठार मारल्याची घटना नागपुरातील हजारीपहाड भागात घडली. आरोपी माेईन खान फरार झाला आहे. लक्ष्मीबाई धुर्वे (७०) व यश धुर्वे (१०) अशी हत्या झालेल्या दोघांची नावे आहेत.
लक्ष्मीबाई धुर्वे यांच्या नातीचे व आरोपीचे प्रेमसंबंध होते. मात्र हे प्रेमसंबंध लक्ष्मीबाईंना मान्य नसल्याने त्यांनी दोघांच्या भेटीगाठी बंद केल्या होत्या. धुर्वे कुटुंबीयांनी मुलीला मध्य प्रदेशातील नातेवाइकांकडे ठेवले होते. त्यामुळे आरोपी संतापला होता. या विषयावरून त्याने अनेक वेळा धुर्वे कुटुंबीयांना धमक्याही दिल्या असल्याची माहिती पुढे आली आहे. आरोपीने दिलेल्या धमक्यांना त्यांनी गांभीर्याने घेतले नाही. त्यातच गुरुवारी आरोपीने दुपारच्या सुमारास लक्ष्मीबाई धुर्वे आणि त्यांचा नातू यश हे घरी एकटेच असताना बळजबरीने घरात प्रवेश केला आणि त्या दोघांचीही धारदार शस्त्राने वार करून खून केला. सायंकाळी लक्ष्मीबाई धुर्वे यांचा मुलगा आणि सून कामावरून घरी परतले तेव्हा या दुहेरी खून प्रकरणाचा खुलासा झाला.
अतिशय क्रूरपणे घेतला दोघांचा जीव
घरात शिरलेल्या मोईन खानला लक्ष्मीबाई धुर्वे व नातू यशने प्रतिकार केल्याचे पुरावे पोलिसांना घटनास्थळी आढळले. मात्र, वयोवृद्ध आजी व नातू यशही लहान असल्याने फार प्रतिकार करू शकला नाही. त्यानंतर मात्र आरोपीने अतिशय क्रूरपणे दोघांवर शस्त्राने वार करून त्यांचा खून केला. दोन्ही मृतदेहांवर अनेक जखमा आढळून आल्या आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.