आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना संकट:सलग 36 तास 1300 किमी विक्रमी सायकलिंगद्वारे जमवले 2 लाख रुपये

नागपूरएका वर्षापूर्वीलेखक: प्रवीण पवार
  • कॉपी लिंक
  • डॉ. अमित समर्थ यांची नागपूर मनपाच्या सेवाकार्याला अनोखी साथ

अतुल पेठकर 

कोरोनाच्या संकटात कुणीही उपाशी राहू नये यासाठी मनपाच्या सेवा कार्याला अनेकांची साथ मिळत आहे. कुणी ‘कम्युनिटी किचन’मधून जेवण पुरवत आहे तर कुणी जेवणाची सामुग्री पुरवून मनपाचे हात बळकट करत आहेत. या सेवा कार्याला आता क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींनीही सहकार्य केले आहे. १३०० किमीची सलग ३६ तास इनडोअर सायकलिंग करून डॉ. अमित समर्थ यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून प्राप्त झालेले दोन लाख रुपये सेवा कार्यासाठी दिले आहेत. यामधील निधीचा धनादेश त्यांनी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, नगरसेविका डॉ. परिणीता फुके, मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष प्रा. संजय भेंडे, सचिव प्रा. प्रमोद पेंडके प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रो-हेल्थ फाउंडेशनचे संस्थापक आणि माइल्स एन माइलर्स एड्युरन्स स्पोर्ट््स अकादमीचे संचालक डॉ. अमित समर्थ मनपाच्या स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड ॲम्बेसेडर आहेत. जगातील अनेक कठीण शर्यती पूर्ण करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. कोरोनाच्या संकटकाळातही त्यांनी आपल्या विक्रमी कामगिरीद्वारे साथ दिली आहे. डॉ. समर्थ यांनी ४८ तास “नॉनस्टॉप’ इनडोअर सायकल चालवून १३०० किमी अंतर पूर्ण केले. घरीच ‘ट्रेनर’ आणि ‘ॲप’च्या माध्यमातून ‘व्हर्च्युअल’ पद्धतीचा उपयोग करून त्यांनी सायकल चालवली.

कोराेनाबाबत जागृती आणि निधी समर्पण : डाॅ. समर्थ यांच्या या इव्हेन्टचे फेसबुक लाइव्ह करण्यात आले. या वेळी त्यांनी कोरोनाबाबत जनजागृतीचा, मदतीचा संदेशही दिला. या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांच्याकडे दोन लाख रुपयांचा निधी जमा झाला. या निधीपैकी काही भाग त्यांनी महाराष्ट्र पोलिसांतर्फे करण्यात येत असलेल्या सेवा कार्याला दिला. मनपाच्या सेवा कार्यालाही सहकार्य करण्याची इच्छा त्यांनी नगरसेविका डॉ. परिणीता फुके यांच्याकडे व्यक्त केली व त्यांच्या माध्यमातून त्यांनी उर्वरित रक्कम मनपाच्या माध्यमातून चालवण्यात येत असलेल्या ‘कम्युनिटी किचन’साठी दिली आहे. डॉ. अमित समर्थ यांनी मैत्री परिवार, सीएजी आणि मल्हार फाउंडेशनला या माध्यमातून मदत केली.

असे केले इनडोअर सायकलिंग

: साधारण एक लाख रुपये किमतीचे एक इनडोअर सायकलिंग ट्रेनर मशीन असते. समर्थ यांनी सायकलचे मागचे चाक काढून सायकल मशीनमध्ये लावली. त्यानंतर मशीन मागच्या चाकाचे काम करते. त्याला गिअर लागलेले असतात. समोरच्या लॅपटाॅवर व्झिस्ट (zwist ap) डाऊनलोड करावे लागते. त्यानंतर मशीन आणि अॅप सिंक होते. मशीनमधून निघणारे सिग्नल अॅपशी सिंक्रोनाइज होऊन लॅपटाॅपच्या पडद्यावर आभासी जग (व्हर्च्युअल वर्ल्ड) साकारते. समर्थ सायकलपटू असल्याने त्यांच्या स्क्रीनवर रस्ता आला. त्यात खऱ्याखुऱ्या रस्त्यात असतात तसे चढउतार, खाचखळगे असतात. एका खोलीत या आभासी पडद्यावर सायकल चालवण्यात येते. लॅपटाॅपवर हार्टरेट दिसतो, पायडलमध्ये किती शक्ती ओतली याची माहिती वॅटमध्ये दिसते. एका मिनिटाला कितीदा पायडल मारले तेही दिसते. जगभरातील सायकलिस्ट या मशीनवर घरच्या घरी ट्रेनिंग करतात, असे समर्थ यांनी सांगितले.

असे केले निधी संकलन 

आभासी जगातील एका खोलीतील हे सायकलींग समर्थ यांनी वेब कॅमद्वारे फेसबुक लाईव्ह केले. लोकांना निधी संकलनाचे आवाहन करतानाच सायकलींगविषयी संवाद साधला. “क्राऊड एरा’ या वेबसाईटने क्राऊड फंडिंगची कॅम्पेन तयार करून दिली. त्यावर पैसे भरण्यासाठी एक लिंक दिली जाते. त्यावर लोकांनी पैसे जमा केले.

बातम्या आणखी आहेत...