आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

उत्साह गणेशोत्सवाचा:डाॅक्टर गणपती करतोय कोरोना रुग्णांवर उपचार; नागपूरच्या एकता गणेशोत्सव मंडळाचा कोरोना हाॅस्पिटलचा देखावा

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दहा दिवस काेरोना जागृती करण्यात येणार, कोरोना तपासणीची व्यवस्थाही

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गणेशोत्सव साजरा करण्यावर मर्यादा आल्या आहेत. नागपुरातील गणेश मंडळे हा उत्सव साधेपणाने साजरा करत आहेत. माजी आमदार प्रकाश गजभिये यांच्या एकता गणेश उत्सव मंडळाची मूर्ती एरवी किमान २२ ते २३ फूट उंच असते. याशिवाय अष्टविनायकाचा देखावा असतो. पण, या वर्षी कोरोनामुळे कोरोना केअर हाॅस्पिटलचा देखावा उभा केला आहे. यात डाॅक्टर झालेला गणेशा रुग्णांवर उपचार करताना दिसणार आहे. गर्दी टाळण्यासाठी थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याचे गजभिये यांनी सांगितले. दहा दिवस काेरोना जागृती करण्यात येणार असून कोरोना तपासणीची व्यवस्थाही केली आहे.

यावर्षी एक फुटाची मूर्ती

राणी लक्ष्मीनगर गणेशोत्सव मंडळाने तब्बल ६ फूट उंच आणि २५० किलो वजन असलेल्या पितळेच्या मूर्तीची स्थापना केली आहे. मागील ४ वर्षांपासून हा उपक्रम राबवला जातो. परंतु या वर्षी कोरोनामुळे मातीची एक फुटाची मूर्ती स्थापन करून कार्यक्रमांना फाटा देण्यात आला आहे.