आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुबई सोने तस्करी प्रकरण:आरोपींना रविवारपर्यत पोलिस कोठडी; हातोड्यातून करीत होते सोन्याची तस्करी; 337 ग्रॅम सोने जप्त

नागपूर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबईहून गेल्या महिनाभरापासून नागपुरात सोने व अन्य महागड्या वस्तूंची तस्करी सुरू होती. ते हातोड्यातून सोन्याची तस्करी करीत असल्याची धक्कादायक माहिती तीन लुटारूंच्या अटकेनंतर समोर आली. पोलिसांनी या लुटारूंकडून तब्बल 337 ग्राम सोने जप्त केले. त्यांची रविवारपर्यत पोलिस कोठडी घेण्यात आली आहे.

पोलिस कोठडीत असलेले अटकेतील लुटारू व तस्करांची सखोल चौकशी झाल्यास अनेक खळबळजनक माहिती उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वी जबरी चोरी प्रकरणात गणेशपेठ पोलिसांनी अक्रम मलिक दीन मोहम्मद (वय 32), इर्शाद खान इशाक खान (वय 21, दोन्ही रा. नागौर, राजस्थान) व राहुल हरिश्चंद्र यादव (वय 24, रा. आझमगढ, उत्तर प्रदेश) या तिघांना अटक केली.

तिघेही रविवारपर्यंत पोलिस कोठडीत आहेत. पोलिसांनी तिघांकडून दोन हतोडे जप्त केले. सराफाने हतोडे तोडले असता त्यातून 337 ग्रॅम सोने आढळल्यानंतर पोलिसांमध्ये खळबळ उडाली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तिघे गोरखपूर येथील सूत्रधारांच्या टोळीतील सदस्य आहेत. एक महिन्यापूर्वीपर्यंत सूत्रधार हा दुबईहून दिल्लीला मोबाइल, हतोड्यासह विविध वस्तूंमधून सोन्याची तस्करी करायचा. एक महिन्यापूर्वी दिल्ली विमानतळावर पकडले जाऊ, अशी कुणकूण सूत्रधाराला लागली.त्यामुळे त्याने दिल्लीहून मोर्चा नागपुरात हलविला. टोळीतील सदस्यांना नागपुरात पाठविले.

दुबईहून श्रमिक विमानाने नागपुरात यायचे. त्यांच्याकडील वस्तूंमध्ये सोने असायचे. श्रमिक नागपुरात ही वस्तू टोळीतील सदस्यांकडे देत. त्यानंतर टोळीचे सदस्य रेल्वेने गोरखपूरला जाऊन ते सूत्रधाराच्या स्वाधीन करायचे, असे आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. काही दिवसांपूर्वी लुटपाट करण्यात आलेले महागडे मोबाइल व घड्याळमध्येही सोने असण्याची दाट शक्यता आहे. या वस्तू जप्त झाल्यानंतर सर्वकाही स्पष्ट होईल.

बातम्या आणखी आहेत...