आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुसळधार पाऊस:भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक मार्ग बंद, साकोली परिसरातील अनेक घरांमध्ये शिरले पाणी

नागपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

भंडारा जिल्ह्यांमध्ये गुरुवार दुपारपासून पाऊस सुरू आहे. या पावसाने हाहाकार उडाला आहे. नदीनाल्यांना पूर आला आहे तसेच अनेक मार्ग बंद झाले आहेत. साकोली परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे.

भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे साकोली तालुक्यात साकोली एकोडी रोड परिसरातील काही घरामध्ये नवतलावाचे पाणी आलेला आहे. साकोली-तुमसर रोड चांदोरी गावाजवळ नाल्यावर पाणी आल्याने बंद आहे,साकोली-परसोडी,साकोली-विरसी-सातलवाडा ,साकोली-जमनापुर हे रोड बंद आहेत.बोदरा गावातील तलाव फुटला असून जीवीत हानी झालेली नाही सर्वत्र बंदोबस्त रवाना करण्यात आलेला आहे शांतता आहे.

जिल्ह्यांमध्ये गुरुवार दुपारपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत येथे मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू होता. शुक्रवारी पहाटे पावसाने विश्रांती घेतली. यानंतर सकाळी पुन्हा पावासाला सुरुवात झाली.

बातम्या आणखी आहेत...