आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किचनच्या रिंगणात:नागपूर दौऱ्यात आमदार रोहित पवार यांनी बनवली चक्क 'पुरणपोळी'; पोस्ट लिहून अनुभव केला शेअर

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही दिवसांमध्ये राजकारणात पुरणपुळ्या हा चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता. आता पुन्हा पुरळपोळ्या चर्चेत आल्या आहेत. रोहित पवार नागपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात एका कार्यकर्त्याच्या घरी त्यांनी पुरणपोळीचा आस्वाद घेतला. यावेळी पोळी बनवण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. एवढेच नाही तर पुरणपोळी बनवण्याचाही प्रयत्न केल्याचे फोटो आमदार रोहित पवार यांनी सोशल माध्यमांवर शेअर केलेत.

आमदार रोहित पवार हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त मे रोजी काटोलमध्ये विकासकामाच्या भूमीपूजन कार्यक्रमासाठी नागपूर दौऱ्यावर होते. अनिल देशमुखांच्या मतदारसंघातील सोनोली गावातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी प्रवीण मुनिराज राजणे यांच्या निवासस्थानी रोहित पवार यांनी भेट दिली. प्रवीण यांचे वडील मुनिराज राजणे हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे खंदे समर्थक व एक निष्ठावान अनुभवी कार्यकर्ते आहेत.

रोहित पवार ट्विटमध्ये म्हटले की, एक वेगळ्या पद्धतीने बनवलेल्या या अप्रतिम चवीच्या पुरणपोळ्या खाऊन मन तृप्त झाले. यावेळी पोळी बनवण्याचाही प्रयत्न केला, पण त्यात थोड्याफार प्रमाणातच यश आलं. प्रवीण यांचे वडील मुनिराज राजणे हे शरद पवार यांचे एक निष्ठावान व अनुभवी कार्यकर्ते आहेत. यापूर्वी पवारांनीही त्यांच्या घरी भेट दिली असल्याने या भेटीच्या आठवणींनाही यावेळी उजाळा मिळाल्याचंही रोहित पवार यांनी सांगितले.

आमदार रोहित पवार सोशल मीडियावर विविध कारणास्तव नेहमीच चर्चेत राहत असतात. आपल्या दैनिक कामकाजाची माहिती ते सोशल मीडियातून देतात. यापूर्वीही आमदार रोहित पवार आपल्या अनेक कार्यकर्त्यांच्या दुकानात, घरी गेले आहेत. कोणताही अभिनिवेश न दाखवता अगदी साधेपण ते जपत आहेत. त्यांच्या या साधेपणावर कार्यकर्तेही भाळत असून त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.

बातम्या आणखी आहेत...