आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोर्चा:अधिवेशनात मेस्टातर्फे विधानसभेवर 5 हजार शिक्षक-संस्थाचालकांचा मोर्चा

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनतर्फे पाच हजार शिक्षक व संस्थाचालकांचा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मेस्टाने दिली आहे. महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन नागपूर जिल्ह्याच्या त्रैमासिक आमसभेची बैठक सेंट पॉल हायस्कूल हुडकेश्वर येथे आयोजित करण्यात आली होती. या सभेत विभिन्न तालुक्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मागील तीन महिन्यातील कार्यकारिणीने केलेल्या कामाचा आढावा ठेवण्यात आला.

आरटीई प्रतिपूर्ती बाबत शासनाची उदासीनता बघता व शालेय शिक्षण विभागाकडे अनेक प्रश्न प्रलंबित असल्या कारणाने येत्या हिवाळी अधिवेशनात संघटनेतर्फे विधानसभेवर पाच हजार शिक्षक व संस्थाचालकांचा मोर्चा नेण्याबाबतचा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ. राजाभाऊ टाकसाळे व डॉ. निशांत नारनवरे होते. त्याचबरोबर निरू कपाई, कपिल उमाळे, गजेंद्र चौकसे, सुधाकर कांबळी, ऋषिकेश किंमतकर व प्रशांत शेंडे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...