आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गायीच्या शेणापासून पर्यावरणपूरक वेदिक (प्राकृतिक) पेंट (रंग) तयार करण्यात एमएसएमईअंतर्गत असलेल्या खादी ग्रामोद्योग आयोगाने यश मिळवले आहे. जयपूरच्या कुमारप्पा नॅशनल हँडमेड पेपर इन्स्टिट्यूटने हे उत्पादन विकसित केले आहे.
गायीच्या शेणापासून या पेंटची निर्मिती फेब्रुवारी २०२० मध्ये करण्यात आली. वेदिक पेंट डिस्टेंपर व प्लास्टिक इमल्शन प्रकारात तयार करण्यात आला आहे. यासाठी वापरण्यात आलेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग शेतकरी, गोशाळा संचालक आणि स्थानिक उद्योजकांना होणार आहे. तंत्रज्ञानामुळे गावातही सहजपणे पेंट बनवणे शक्य होईल. या उत्पादनामुळे देशातील लाखो नागरिकांना स्वत:च्या वापरासाठी अत्यंत स्वस्त व आंतरराष्ट्रीय दर्जाचा पेंट उपलब्ध होईल. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. गायीचे शेण खादी ग्रामोद्योग आयोग ५ रुपये किलो दराने विकत घेणार आहे. एप्रिल ते नोव्हेंबर २०२० दरम्यान ४६५० किलो गायीचे शेण विकत घेण्यात आले. त्या बदल्यात २३२५० रुपये जयपूरच्या गोशाळेला मिळाले. या पेंटची तपासणी नॅशनल टेस्ट हाऊस मुंबई, श्रीराम इन्स्टिट्यूट फॉर इंडस्ट्रियल रिसर्च नवी दिल्ली आणि नॅशनल टेस्ट हाऊस गाझियाबाद या तीन संस्थांनी केली. ‘बीआयएस’ दर्जाचे प्रमाणपत्रही या उत्पादनाला देण्यात आले. बाजारात मिळणाऱ्या पेंटच्या तुलनेत या वेदिक पेंटचा दर जवळपास निम्मा आहे. खादी वेदिक डिस्टेंपर १२० रुपये लिटर, इमल्शन २२५ रुपये लिटर आहे.
नितीन गडकरी यांनी केला खादी नैसर्गिक पेंट लाँच
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी खादी प्राकृतिक पेंट लाँच केला. गायीच्या शेणापासून तयार हा रंग अँटिबॅक्टेरियल, अँटी फंगल व वॉशेबल आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या मदतीने या रंगाची विक्री केली जाणार आहे. या नैसर्गिक उत्पादनाला शेणाचा गंध राहणार नाही, असा आयोगाचा दावा आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.