आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नागपूर:ईडीची नोटीस गांभीर्याने घेण्याची गरज नाही, आजकाल कोणालाही येते; प्रफुल्ल पटेल यांचा टोला

नागपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोणी चुकीचे केले असेल तर समोर येईल. यात राजकारण आहे का हे ही त्यामुळे दिसून येईल : प्रफुल्ल पटेल

भारतात अनेकांना ईडीची नोटीस येत असते. त्यात काही नवीन नाही. ईडीची नोटीस येणे खूप स्वस्त झाली असून आजकाल कुणालाही नोटीस बजावल्या जाते, असा टोला राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी लगावला.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीकडून आलेल्या नोटीशीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. ईडीच्या नोटीसमध्ये काहीच नवीन नाही. भारतात अनेकांना ईडीच्या नोटीस येतात. ईडीची नोटीस येण्याचे कोणालाही वाईट वाटत नाही. कारण आजकाल कोणालाही नोटीस बाजवली जाते, मग त्या व्यक्तीचा संबंध असो वा नसो, असा टोला प्रफुल्ल पटेल यांनी हाणला. ईडीच्या नोटीसला गांभीर्याने घेण्याची गरज नाही. कोणी चुकीचे केले असेल तर बाहेर येईल. यात राजकारण आहे का हे ही त्यामुळे दिसून येईल, असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...