आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडोनेशियन संघटित सिंडिकेट असल्याचे स्पष्ट:ईडीकडून 11.5 कोटींची 289.57 मेट्रिक टन बेहिशेबी सुपारी जप्त

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) १ डिसेंबर रोजी नागपुरातील सुपारी व्यापाऱ्यांकडे छापेमारी केल्यामुळे नागपूरसह मध्य भारतातील सुपारी व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. शहरातील सुपारीकिंग छटवाल याला आसाम पोलिसांनी अटक केल्याच्या बातमीनंतर प्रकाश गोयल, आसिफ कलीवाला, दिग्विजय ट्रान्सपोर्टचे हिमांशू भद्रा आदींवरही छापे मारल्याने सुपारी व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. नागपुरातील सुपारी व्यापाऱ्यांकडील ११.५ कोटी रुपयांची २८९.५७ मेट्रिक टन बेहिशेबी सुपारी ईडीने जप्त केली. ईडीच्या तपासात इंडोनेशियन सुपारीचे पुरवठादार, कमिशन एजंट, लॉजिस्टिक प्रोव्हायडर, ट्रान्सपोर्टर्स, हवाला ऑपरेटर आणि खरेदीदार यांचे एक सुसंघटित सिंडिकेट असल्याचे समोर आले आहे. हे सिंडिकेट भारत-म्यानमार सीमेवरून इंडोनेशियन सुपारीची भारतात तस्करी करत होते.

माहितीनुसार, पीएमएलएअंतर्गत मुंबई आणि नागपूरमध्ये १७ प्रतिष्ठानांची झडती घेण्यात आली. इंडोनेशियन सुपारीच्या तस्करीमध्ये गुंतलेल्या विविध व्यक्तींचे कार्यालय आणि निवासी परिसर समाविष्ट होता. प्रामुख्याने भारत-म्यानमार सीमेवरून सुपारीची तस्करी होते. ईडीच्या झडतीदरम्यान नागपूर येथे पीएमएलएअंतर्गत अंदाजे ११.५ कोटी रुपयांची २८९.५७ मेट्रिक टन बेहिशेबी सुपारी जप्त करण्यात आली आहे. ईडीने १६.५ लाख रुपये रोख, विविध कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत. छापेमारी केलेले सर्व व्यापारी विदेशी सुपारी आयात करणारे आहेत.

बातम्या आणखी आहेत...