आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनिल देशमुख पुन्हा निशाण्यावर:माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी ईडीचे पथक दुसऱ्यांदा दाखल, 100 कोटी वसूलीच्या आरोपांप्रकरणी कारवाई

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि काटोलचे राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील घरी अंमलबजावणी संचलनालयाचे अधिकारी दाखल झाले आहेत. यापूर्वीही ईडीच्या तीन पथकांनी १६ जून रोजी देशमुख यांच्याशी संबंधित दोन सीए व एका कोळसा व्यापाऱ्याच्या घरी धाड घातली होती. त्या नंतर लवकरच पुन्हा देशमुखांची चौकशी केली जाईल ही अटकळ या छाप्याने खरी ठरली. याआधी नागपुरात सहा उद्योगपतींवर ईडीने छापेमारी केली होती. हे सहा उद्योगपती अनिल देशमुख यांच्या आणि कुटुंबीयांसोबत व्यावसायिक भागिदारीत असल्याचा ईडीला संशय आहे.

दुसरीकडे, एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी काल २४ जून रोजी ईडीने डीसीपी राजू भुजबळ यांचा जबाब नोंदवला आहे. अनिल देशमुख यांनी दरमहा १०० कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. ५ एप्रिल रोजी उच्च न्यायालयाने या प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश दिले. आणि त्यानंतर अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला. १४ एप्रिलपासून अनिल देशमुखांची सीबीआय चौकशीही सुरू झाली आहे.

१०० कोटींच्या मागणीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सीबीआयने देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. कोलकोता येथे दोन बनावट कंपनीचे दस्तऐवज सीबीआयला आढळले होते. या बनावट कंपनीद्वारे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाले. ते देशमुखांशी संबंधित असल्याचा संशय सीबीआयला आला. त्यानंतर या प्रकरणात ईडीही सक्रिय झाली. ईडीने गुन्हा दाखल केला. २५ मे रोजी ईडीच्या तीन पथकांनी अंबाझरीतील शिवाजीनगरमधील हरे कृष्ण अपार्टमेंट येथील सागर भटेवारा, सदरमधील न्यू कॉलनीतील समीत आयझॅक व गिट्टीखदानच्या जाफरनगरमधील कादरी बंधूंकडे छापे टाकले. तिघेही देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांचे मित्र आहेत.

बातम्या आणखी आहेत...