आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ईडी’कडून छापेमारी:‘चर्च ऑफ नॉर्थ इंडिया’च्या कार्यालयात ‘ईडी’ची झडती

नागपूर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी बिशप पी. सी. सिंहच्या घोटाळ्यामुळे चर्चेत आलेल्या ‘चर्च ऑफ नॉर्थ इंडिया’च्या (सीएनआय) देशभरातील ११ कार्यालयांवर ‘ईडी’कडून बुधवारी छापेमारी करण्यात आली. ‘ईडी’च्या पथकाने ‘सीएनआय’च्या नागपुरातील सदर परिसरात असलेल्या कार्यालयाची झडती घेतली. या वेळी २ तास शोधमोहीम चालली आणि विविध कागदपत्रे जप्त करण्यात आली. मागील दोन आठवड्यांतील नागपुरातील ‘ईडी’ची ही दुसरी मोठी कारवाई आहे. वादग्रस्त बिशप पी. सी. सिंहने ‘सीएनआय’अंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये अनेक गैरप्रकार केले. याशिवाय संस्थेच्या जमिनी व इतर आर्थिक बाबींमध्येदेखील भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये मध्य प्रदेश पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सिंहला नागपूर विमानतळावरून अटक केली होती. ‘ईडी’नेदेखील फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल केला होता.

बातम्या आणखी आहेत...