आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

नागपूर:कौटुंबिक वादातून वडीलांनी आठ महिन्याच्या मुलीची पाण्यात बुडवून केली हत्या

नागपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बियरची बाटली फोडून गळ्यावर वार करीत स्वत:लाही संपवण्याचा प्रयत्न केला

कौटुंबिक वादातून वडीलांनी आठ महिन्याच्या मुलीची पाण्यात बुडवून हत्या केली. नंतर बियरच्या बाटलीने गळ्यावर वार करीत स्वत:लाही संपवण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ माजली आहे.

नागपुरातील सक्करदरा पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या भांडे प्लाॅट परिसरातील शिवमठाजवळ सोनू इजराइल शेख याचे सयुक्त कुटुंब आहे. तीन मजली इमारतीत एकेका मजल्यावर एकेका भावाचे कुटुंब राहाते. घरातील वादामुळे शेख अस्वस्थ होता. दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास सर्व सामसुम असताना शेख त्याच्या मुलीला घेऊन शिवमठात गेला. तिथे पाण्याने भरलेल्या ड्रममध्ये बुडवून आठ महिन्याच्या मुलीची हत्या केली. नंतर बियरची बाटली फोडून गळ्यावर वार करीत स्वत:लाही संपवण्याचा प्रयत्न केला.

या घटनेचे वृत्त समजताच सक्करदरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. व जखमी सोनू शेखला मेडिकलमध्ये दाखल केले. तीन भाऊ एकाच इमारतीत राहाता असतानाही कोणालाही याची भनकही लागली नाही. सोनूच्या मनात नेमके काय चालले आहे, याचा थांगपत्ताही कोणाला लागला नाही. सोनू शेख उपचारातून काही सांगण्या इतका बरा झाल्यावर पोलिस चौकशी करणार आहे.