आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या राजकारणाचा नवा अध्याय:आमदारांची नाराजी ही अल्पकाळाची; बंडखोरीबद्दल आत्मचिंतन करणार - नाना पटोले

नागपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात भाजपचे राजकारण ज्या पद्धतीने चालले आहे. त्याचाच हा अध्याय आहे. भाजप केंद्राच्या सत्तेचा, यंत्रणेचा गैरवापर करत आहे. सत्तेपासून पैसा आणि पैशांपासून पुन्हा सत्ता, असे भाजपाचे चक्र असून, असत्याचा मार्ग त्यांनी निवडला आहे. यामध्ये सत्याचा विजय होईल. ऊन आणि सावली जसे निसर्गाचा नियम आहे. महाराष्ट्रावर आलेल्या संकटाचे नक्कीच सावलीमध्ये रुपांतर होईल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोल यांनी दिली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेनेचे अनेक आमदार सध्या नॉट रिचेबल आहेत. त्या पार्श्वभूमीवर नाना पटोले नागपूरात पत्रकारांशी बोलत होते.

बहुमताचा आकडा लांब

पुढे ते म्हणाले की, आज मुंबईत काँग्रेसची बैठक असून, त्यात काँग्रेसच्या सर्व आमदार हजर राहणार आहेत. दिवसा सत्तेचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांपासून बहुमताचा आकडा अजून लांब आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला कुठलाही अडसा नाही, कालच्या विधान परिषद निवडणुकीत मतांची बंडखोरी झाली त्याचे आम्ही आत्मपरिक्षण करणार आहोत. ज्या कोणी बंडखोरी केली असेल, त्याची माहिती हायकमांडला दिली जाणार आहे.

लोकशाहीसाठी हे घातक

भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरूपयोग करत आहे. पैशाने सत्ता कशी कमवता येईल याची रणनीती भाजपची असून, लोकशाहीसाठी हे घातक आहे. मात्र, सत्याचा विजय होईल, असेही पटोले म्हणाले.