आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाला अनेकांनी विरोध केला, मात्र फडणवीसांनी आणि आम्ही एकत्र येत हा प्रकल्प पूर्ण केला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महामार्गांची जमीन अधिग्रहण करत असताना अनेक अडचणी आल्या. लोकांनी त्यासाठी विरोध करायला लावला, जमीनी देऊ नये, प्रकल्प होऊ नये यासाठी अनेकांनी प्रयत्न केला, असा आरोप एकनाथ शिंदेंनी अप्रत्यक्ष शरद पवारांना टोला लगावला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी आणि देवेंद्र फडणवीस कुशलपणाने सर्वांना सोबत घेत महामार्गाचे काम सुरू ठेवले. सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व लोक एकत्र आहे, असे कुठे घडले नाही असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, रस्त्याच्या बाजूला आम्ही अनेक नगरे वसवणार आहे. तर या 700 किमीच्या मार्गावर औद्योगिक वसाहती तयार करत राज्याचा विकास करणार आहोत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही सर्व जण सुरूवातीपासून एकत्र आलो.राज्यातील सरकार हे जनतेचे सरकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या दिवसापासून आमच्या सोबत आहेत, अनेक खात्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास निधी दिली आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, उदघाटनाचा हा क्षण माझ्यासाठी केवळ स्वप्नपूर्ती नाही तरा आनंदाचा आणि गर्वाचा क्षण आहे. कारण या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले याचा अभिमान आहे. तर आनंद यांचा आहे, की देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या काळात माझयावर जो विश्वास दाखवला आणि त्यांच्या संकल्पनेतून मी जे काम केले,आणि आता मी मुख्यमंत्री असताना या महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असल्याचा आंनद असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे. तर हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव या महामार्गाला दिले याचाही आम्हाला अभिमान आहे, असेही शिंदेंनी म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.