आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

गडचिरोली:सी-60 कमांडो आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक नक्षलवादी ठार; घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य जप्त

गडचिरोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिसांनुसार, घटनास्थळापासून 20 पिठ्ठू बॅग आणि शस्त्रास्त्रासह मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त केले
Advertisement
Advertisement

गडचिरोलीच्या गट्टा भागात शुक्रवारी सी -60 टीम आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका नक्षलवाद्याला ठार करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात नक्षल आणि दैनंदिन वापरातील साहित्य जप्त केले आहे. नक्षलांच्या छावणीला उद्धवस्त केले.

गडचिरोलीचे एसपी शैलेश बलकवडे यांनी घटनेची पुष्टी करत सांगितले की, शुक्रवारी संध्याकाळी साडे 5 वाजता गट्टा भागातील जंगलात सी-60 टीमची शोधमोहीम सुरू होती. तेवढ्यात नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. सुमारे 20 मिनिट दोन्हीकडून गोळीबार सुरू होता. यानंतर घनदाट जंगलाचा फायदा घेऊन नक्षलवाद्यांनी तेथून पळ काढला. पोलिसांनी आजूबाजूला पाहणी केली असता एक नक्षलवादी मृतावस्थेत सापडला.

फरार नक्षलवाद्यांसाठी शोधमोहीम 

पोलिसांनुसार घटनास्थळावरून एक हत्यार, 20 पिट्ठू बॅगसह मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य जप्त केले. घटनास्थळावरून पळून गेलेल्या नक्षलवाद्यांच्या शोधात आजूबाजूच्या परिसरात शोध मोहीम सुरू आहे.

गडचिरोलीत सतत नक्षलवादी संघटनेची बैठक सुरू आहे 

पोलिस सुत्रांनुसार, गडचिरोली भागात अनेक दिवसांपासून नक्षली दलाची बैठक सतत सुरू आहे. यामुळे पोलिसांनी कारवाईला वेग दिला आहे. बुधवारी राजनांदगाव पोलिसांशी ज्या नक्षलवाद्यांची चकमक झाली ते देखील गडचिरोली येथील बैठकीत सामील होऊन परत येत होते.

Advertisement
0