आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चकमक:गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सब इंस्पेक्टर आणि कॉन्स्टेबल शहीद, तर 3 जवान जखमी

गडचिरोलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
शहीद सब इंस्पेक्टर धनजी होनमेन - Divya Marathi
शहीद सब इंस्पेक्टर धनजी होनमेन
  • एनकाउंटरनंतर अनेक नक्षलवादी जंगलात पळून गेले, त्यांचा शोध सुरू

महाराष्ट्रातील गडचिरोलीमध्ये रविवारी सी-60 कमांडो टीम आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यात सब इंस्पेक्टर धनजी होनमेन (30) आणि कॉन्स्टेबल किशोर आत्माराम शहीद झाले आहेत. यात तीन जवानदेखील जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान ही चकमक पोयारकोटी-कोपरशीच्या जंगलात घडली. चकमकीनंतर नक्षली जंगलात पळून गेले, सध्या त्यांचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी भामरागड तालुक्यातील कोठी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अल्लंदी-गुंडुरवाही गावाजवळ नक्षलवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर सी-60 कमांडो टीम घटनास्थलावर पोहचली. यादरम्यान नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. यात सब इंस्पेक्टर आणि कॉन्स्टेबल शहीद झाले तर इतर तीन जवान जखमी झाले.

बातम्या आणखी आहेत...