आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर:एनकाऊन्टर स्पेशालिस्ट दया नायकची गोंदिया बदली रद्द, मॅटने स्थगिती दिल्याने मुंबई एटीएस मध्येच राहणार

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एनकाऊन्टर स्पेशालिस्ट पोलिस अधिकारी दया नायक यांची दहशतवादी विरोधी पथकातून गोंदीया येथील जात पडताळणी समितीत बदली करण्यात आली होती. या बदलीला मॅटने स्थगिती दिली आहे.

मॅटने दया नायक यांच्या गोंदीया येथील बदलीच्या निर्णयाला स्थगिती दिली असून त्यांना मुंबई एटीएस येथेच कार्यरत राहण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासकीय कारणास्तव ही बदली करण्यात अाल्याचे त्यांच्या बदली आदेशात नमुद करण्यात आले होते.

दया यांनी मनसुख हिरेन प्रकरणात महाराष्ट्र एटीएसकडून तपास करत वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे आणि त्याच्या सहआरोपींचा पर्दाफाश करण्यात मोठी कामगिरी बजावली होती. मात्र हे प्रकरण एनआयएकडे सोपवल्याने एटीसएसचा तपास थांबला होता. दया नायक मुंबईच्या पोलिस वर्तुळातील नेहमीच चर्चेत असणारे नाव आहे. मुंबई पोलिस दलात १९९५ मध्ये दाखल झालेल्या नायक यांनी अनेक गुंडांना चकमकीत ठार मारले. त्यांच्यावर मुंबईतील अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचेही आरोप झाले होते. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेही कारवाई केली होती. दया नायक यांनी त्यांच्या कर्नाटकातील मूळ गावी शाळा सुरू केली असून त्या शाळेचे उदघाटन बिग बी अमिताभ बच्चन यांनी केले होते. या वेळी एम. एफ. हुसेन, सुनील शेट्टी, अफताब शिवदासानी असे सेलिब्रिटी उपस्थित होते. लालचुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईनंतर नायक यांना तुरुंगात जावे लागले होते. तसेच त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अपसंपदा जमवण्याचा आरोप झाला होता.

साऱ्या प्रकरणांचा न्यायालयीन निपटारा झाल्यानंतर त्यांना पुन्हा १६ जून २०१२ रोजी पुन्हा सेवेत घेण्यात आले. त्यानंतर त्यांची बदली जानेवारी २०१४ मध्ये नागपूर येथे करण्यात आली. पण ते तेथे रूजू झाले नाहीत. त्यामुळे त्यांना जुलै २०१५ मध्ये पुन्हा निलंबित करण्यात आले. त्यानंतर त्यांची नागपूरची बदली रद्द करण्यात आली. त्यांना पुन्हा मुंबई पोलिस दलात ११ जानेवारी २०१६ मध्ये रुजू करून घेण्यात आले. त्यानंतर त्यांना एटीएसमध्ये नियुक्ती देण्यात आली होती. नागपूरला न गेलेले नायक हे गोंदियातही जाणार नाही, असे तेव्हाच बोलले जात होते आणि घडलेही त्यानुसारच. अखेर मॅटने त्यांची गोंदीया बदली रद्द केली आणि त्यांना मंबई शहर एटीएसमध्ये सेवा पूर्ववत करण्यास सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...