आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाढीव वीज बिल प्रकरण:ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पदावर राहू नये;माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सल्ला

नागपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अजित पवार, मुख्यमंत्री ठाकरेंनी तोंडावर पाडले...

राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना वाढीव वीज सवलतीची घोषणा करायला लावून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तोंडघशी पाडले. यामुळे राज्यभर राऊतांची बदनामी झाली. आपल्याला बदनाम करणाऱ्या सरकारमध्ये नितीन राऊत यांनी राहू नये, असा सल्ला माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे पत्रपरिषदेत दिला.

वीज ग्राहकांना शंभर युनिटपर्यंत मोफत देण्याची घोषणाही सरकारने करायला लावली. मात्र त्या घोषणेची अंमलबजावणी करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार डॉ. राऊत यांच्या पाठीशी उभे राहिले नाही. महाविकास आघाडी सरकारनेच सुरुवातीला १०० युनिट वीज बिल माफ करण्याचा शब्द दिला होता, तो पाळला नाही. दिलेल्या एकाही वचनाची पूर्ती या सरकारने केली नाही. उलट आता ९५ लाख लोकांची वीज कापायला निघाले आहेत. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत हे सामाजिक चळवळीतून आलेले नेतृत्व आहे, असे म्हणत बावनकुळे यांनी डॉ. नितीन राऊत यांची पाठराखण केली. मनसेच्या अांदाेलनात भाजप वीज बिलाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या निर्णयाचे स्वागत करून त्यांचे अभिनंदन करताना भाजपसुद्धा त्यांच्यासोबत या आंदोलनात असेल, अशी घोषणा बावनकुळे यांनी या वेळी केली. भाजपने महापालिका निवडणुकीसाठी मुंबईत मोर्चेबांधणी सुरू केलेली असतानाच बावनकुळे यांनी हे वक्तव्य केल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.

बातम्या आणखी आहेत...