आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज आंतरराष्ट्रीय युवा दिन:वेबटूलच्या माध्यमातून तरुणांना दिले उद्योजकता प्रशिक्षण; तब्बल पन्नास जणांनी सुरू केले स्टार्टअप

नागपूर4 महिन्यांपूर्वीलेखक: अतुल पेठकर
  • कॉपी लिंक
  • नागपूरच्या अभिजित खंडागळे याचा उपक्रम, शंभर जणांनी पूर्ण केला अभ्यासक्रम

कोरोनाकाळात जीवनव्यवहारच ठप्प झाले. अनेकांची नोकरी व रोजगार गेला. प्रत्यक्ष शिक्षण जाऊन आभासी म्हणजे आॅनलाइन शिक्षण सुरू झाले. पण, प्रत्येकाजवळ स्मार्टफाेनही नव्हता. अशा वेळी अभिजित खंडागळे व त्याच्या सहकाऱ्यांनी ‘एकत्र’ हे वेबटूल सुरू करून आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या आयटीआय व तंत्रनिकेतनमधील सुमारे १५०० गरीब विद्यार्थ्यांना उद्योजकता प्रशिक्षण दिले. या वेबटूलमार्फत साध्या मोबाइलवर एक फाेन काॅल आणि एसएमएसद्वारे शिक्षण देण्यात आल्याचे अभिजितने सांगितले. यात कॉन्फरन्स काॅल तसेच झूम मीटिंगद्वारे अभ्यासक्रम शिकवण्यात आला. टेलिग्रॅमचाही उपयोग केल्याचे अभिजितने सांगितले.

तरुण उद्यमींना उद्योजकता प्रशिक्षण देण्याचे काम अभिजित करतो. स्वामी विवेकानंद केंद्रामार्फत ११०० व उद्योजकता विकास केंद्रामार्फत १२०० युवकांना प्रशिक्षण दिले. पुण्याच्या जीटीपी फाउंडेशनच्या सहकार्याने ३ हजार महिलांना उद्योजकता प्रशिक्षण दिले. याशिवाय वृक्ष फाउंडेशनमार्फत अभिजित विविध उद्योजकता कार्यक्रम घेतो. आतापर्यंत आठ ते दहा हजार युवकांपर्यंत पोहोचण्यात यश आले आहे. नागपुरात ५०० युवा स्टार्टअपचा एक ग्रुप आहे. त्यात उद्योजक, गुंतवणूकदार, शेअर मार्केट, व्यवसाय तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन केले जाते. या उपक्रमामध्ये सूरज सिंग, वीरेन धवन, प्रसेनजित देबराॅय, पाॅल एलियास, तेजस नंदन यांचा सहभाग आहे. आजघडीला ३३ संस्थांनी गरीब विद्यार्थ्यांना शिकवण्याची तयारी दर्शवल्याचे सांगण्यात आले.

नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्यावर विशेष भर
केंद्रीय उद्योग मंत्रालयासह उद्योग संघटना, काॅर्पोरेट‌्स, आयएनजीओ आणि विद्यापीठांशी सामंजस्य करार केले आहेत. याद्वारे तरुणांना उद्योजकतेकडे वळवण्याचा माझा प्रयत्न असतो, असे अभिजितने सांगितले. तरुणांमध्ये काही करण्याची ऊर्मी असते. फक्त त्यांना योग्य संधी आणि प्रशिक्षण देणे गरजेचे अाहे. आयटीआय, शासकीय तंत्रनिकेतनमधील विविध ट्रेडमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना या संधी देण्यावर माझा भर आहे, असे तो म्हणाला. व्यवसायात नवनवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्यावर माझा विशेष भर आहे, असे अभिजित म्हणाला.

बातम्या आणखी आहेत...