आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्देश:वैनगंगेच्या प्रदूषणमुक्तीसाठी पर्यावरणमंडळाला तत्काळ अहवाल मागितला, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचे निर्देश

भंडारा7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भंडारा जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैनगंगा नदीत नागपूर येथील कारखान्यांमधील रसायनयुक्त दूषित पाणी सोडले जाते. त्यामुळे नदीकाठावरील ३८ गावांतील नागरिकांचे धोक्यात आले आहे. त्यामुळे भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे आग्रही मागणी केली होती. त्याअनुषंगाने ठाकरे यांनी पर्यावरण मंडळाला महिनाभरात अहवाल मागितला आहे.

नागपूर येथील एमआयडीसीतील कारखान्यांमधून सुमारे ५६० एमएलडी रसायनयुक्त प्रदूषित पाणी आणि नागपूर शहरातील सांडपाण्यासह अन्य प्रदूषणयुक्त कचऱ्याची नागनदी आणि क न्हान नदीच्या माध्यमातून वैनगंगा नदीत सोडल्या जात आहे. त्यातील केवळ ४३० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जात असून उर्वरित दूषित पाणी वैनगंगा नदीत प्रवाहित होत असल्याने इकोर्निया वनस्पतीची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तर, दूषित पाणी नदीच्या माध्यमातून नागरिकांना आणि जनावरांच्या पोटात जात आहे. त्यामुळे सर्वांचे जीव धोक्यात आले आहे.

या दूषित पाण्याचा फटका भंडारा आणि पवनी तालुक्यातील नदीकाठावरील सुमारे ३८ गावांना बसत आहे. त्यामुळे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे आग्रही भूमिका मांडली. त्यांच्या तक्रारीची दखल घेत नामदार ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलावून एक समिती गठीत केली. प्रदूषण मंडळाला महिनाभरात वैनगंगा नदीबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. सोबतच नागपूर महानगर पालिकेच्या आयुक्तांनी ऑगस्ट महिन्यात जलशुध्दीकरण प्रकल्प तयार करून तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश या बैठकीत दिले.

बातम्या आणखी आहेत...