आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकवरून आले होते पार्सल:नागपूरच्या जीपीओ ऑफिसात पार्सलमध्ये ज्वलनशील पदार्थाचा स्फोट

नागपूर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीपीओमध्ये रेल्वे मेल सर्व्हिसचे पार्सल हब आहे. तिथे नाशिकहून बुक झालेल्या एका पार्सलमध्ये आपटबार आढळले. त्याचा स्फोट झाल्याने धुवा यायला लागला. त्यामुळे कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. या बाबत लागलीच पोलिसांना कळवण्यात आले. घटनेचे गांभीर्य पाहाता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्फोट झालेले पार्सल जप्त केले आहे.

नाशिकमधील एका पोलिस अधिकाऱ्याने वर्धा जिल्ह्यातील देवळीसाठी हे पार्सल पाठवले होते. पोलिसांनी संबंधित स्फोटके जप्त केली असून ते पार्सल कोणत्या उद्देशाने पाठवण्यात आले होते त्याचा तपास सुरू केला आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरातील मुख्य डाकघरात स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा स्फोट मोठा नसला तरी पोस्टात आलेल्या एका पार्सलमध्ये हा स्फोट झाल्याने धोक्याची घंटा वाजली आहे. स्फोट झालेले पार्सल नाशिकवरून आले होते. पाळीव प्राण्याकरीता उपयोगात येणारे ज्वलनशील पदार्थ या पार्सलमध्ये होते. जनरल पोस्ट ऑफिसपासून जवळच अनेक मंत्र्यांचे बंगले आणि महत्त्वाच्या खात्याची कार्यालले आहेत. शिवाय जूने आमदार निवास तसेच विधानभवनही जवळच आहे.

नागपुरच्या शहरातल्या जनरल पोस्ट ऑफिसमध्ये मंगळवारी संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास हा स्फोट झाला आहे. नाशिकवरून एक पार्सल वर्धा जिल्ह्यातील देवळीसाठी पाठवण्यात आले होते. तेच पार्सल नागपूरच्या जनरल पोस्ट ऑफिसमधील रेल्वेच्या पार्सल हबमध्ये पोहोचल्यानंतर कर्मचारी त्याला हाताळत असताना त्यामध्ये छोटा स्फोट झाला. या स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाल्याचे चित्र आहे.

स्फोटाची माहिती पोलिसांना देण्यात आली. सीताबर्डी पोलिस स्टेशनचे पथक तसेच बॉम्ब शोधक आणि नाशक पथक घटनास्थळी पोहोचले आहे. ते पार्सल तपासण्यात आले असता त्यामध्ये शेतावर किंवा जंगलात जनावरांना पळवण्यासाठी वापरले जाणारे अल्प ते मध्यम प्रतीचे स्फोटक सापडली.

बातम्या आणखी आहेत...