आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एंटिलियाबाहेरील स्फोटकांचे नागपूर कनेक्शन:मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्फोटके नागपूरच्या सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीची

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराजवळ स्कॉर्पिओ गाडीत जिलेटीनच्या 20 कांड्या सापडल्या होत्या

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या कार मधील जिलेटीनच्या कांड्या नागपूर येथील इकॉनोमिक एक्सप्लोझिव्ह कंपनीत तयार झाल्याची माहिती मिळाली आहे. सोलर एक्स्प्लोझिव्ह ही जगातील चौथी मोठी स्फोटक तयार करणारी कंपनी आहे. विहीर खोदणे आणि खाण कामासाठी ही स्फोटके प्रामुख्याने पुरवली जातात. सोलर इंडस्ट्रीजचे चेअरमन सत्यनारायण नुवाल यांनी यासंबंधी मुंबई पोलिसांनी माहिती दिल्याचे सांगितले.

"गुरूवारी मध्यरात्री १.३० वाजता मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांचा आम्हाला फोन आला होता. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर पार्क करून ठेवलेल्या कारमध्ये सापडलेल्या जिलेटीनच्या कांड्या सोलर एक्सप्लोझिव्ह मध्ये तयार झाल्या आहेत. अशी माहिती या अधिकाऱ्यांनी आम्हाला दिली', असे नुवाल यांनी सांगितले.

"आम्ही प्रत्येक बॉक्सवर बार कोड लावतो त्याद्वारे जिलेटीन कुणी घेतले त्याचा कसा प्रवास झाला याची माहिती आमच्याकडे आणि पेट्रोलियम अॅण्ड एक्सप्लोझिव्ह सेफ्टी आॅर्गनायझेशन या संस्थेकडे कडे असते. मात्र, नुसत्या जिलेटीनच्या कांड्या पाहून त्यानुसार ते आले कुठून सांगता येणार नाही. कारण त्यावर बारकोड नसतो, असे नुवाल यांनी सांगितले.

सुट्या एक्स्पोजिव्ह कांड्या विकत नाही

मुकेश अंबानी यांच्या घराजवळील वाहनात सापडलेल जिलेटिन सुटे होते. सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनी सुट्या एक्स्पोजिव्ह कांड्या विकत नाही. येथील एक्स्प्लोझिव्ह कंपनी पॅकिंग बॉक्समध्येच त्यावर संबधित कारखानदार किंवा अन्य कोळसा उत्खनन करणाऱ्या कंपनी संचालकांचे कोड टाकून जिलेटीनचे बॉक्स विकतात. वाहनात आढळलेल्या जिलेटीनच्या कांड्या कुठल्या डब्यातील आहे याचा शोध घेतला तर अधिक माहिती मिळू शकते, असेही नुवाल यांनी स्पष्ट केले.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाजवळ स्कॉर्पिओ गाडीत गुरूवार 25 रोजी स्फोटके सापडली. जिलेटीन स्फोटकाच्या 20 कांड्या या गाडीत सापडल्या होत्या. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई गुन्हे शाखेला चौकशीचे आदेश दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...