आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस अभियान:नक्षलवाद्यांनी लपवलेली स्फोटके पोलिसांकडून जप्त, कुरखेडा पोलिस उपविभागांतर्गत हेटळकसा जंगलात अभियान

गडचिरोली3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील कुरखेडा पोलिस उपविभागांतर्गत हेटळकसा जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवत असताना गोपनीय माहितीवरून संशयित ठिकाणी लपवून ठेवलेली स्फोटके व इतर साहित्य शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. विशेष अभियान पथक गडचिरोली, ‘सीआरपीएफ’ १९२ बटालियनचे ‘यंग प्लाटून’चे जवान व बॉम्बशोधक पथकाच्या जवानांनी ही कामगिरी केली. नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर ही मोठी कारवाई केल्यामुळे नक्षलींना हादरा बसल्याचे बोलले जात आहे.

नक्षलवाद्यांकडून २८ जुलै ते ३ ऑगस्ट यादरम्यान नक्षल सप्ताह पाळण्यात येतो. सप्ताहादरम्यान अनेक हिंसक कारवाया तसेच सुरक्षा दलांना धोका होऊ शकेल अशा इतर ठिकाणी स्फोटके, शस्त्र साहित्य व दारूगोळा इत्यादी जमिनीत पुरून ठेवले जाते. या वर्षी नक्षलवादी कुठलीही हिंसक कारवाई करू शकले नाहीत. मात्र त्यांनी तयारी करून ठेवली होती. उपविभाग कुरखेडाअंतर्गत येत असलेल्या पोमके कोटगुल हद्दीत हेटळकसा जंगल परिसरात कोरची एलओएस, टिपागड एलओएस व कंपनी क्र. ४ च्या नक्षलवाद्यांनी पोलिस पथकांना नुकसान पोहोचवून मोठा घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने दारूगोळा, स्फोटके व इतर साहित्य पुरून ठेवले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या आदेशाने अपर पोलिस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात नक्षलविरोधी अभियान राबवले.

टाकीमध्ये होते लपवलेले साहित्य
हे डंप पाण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या मोठ्या टाकीमध्ये लपवून पुरून ठेवले होते. यात २ कुकरपैकी स्फोटकांनी भरलेला एक कुकर, ४ कार रिमोट, ३ वायर बंडल, ८ पॉकेट डिस्ट कलर, पिवळ्या रंगाची पावड, राखाडी रंगाची पावडर, ५० किलो पांढरी पावडर, २ नक्षलवादी पुस्तके, १ प्लास्टिक पाण्याची टाकी इत्यादी साहित्य जप्त केले. स्फोटकांनी भरलेला कुकर घटनास्थळीच नष्ट केला व इतर साहित्य गडचिरोली येथे आणले.

बातम्या आणखी आहेत...