आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोला:इच्छा व्यक्त करा; पण सध्या मुख्यमंत्रिपद रिकामे नाही, नाना पटोलेंना प्रफुल्ल पटेलांचा टोला

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'लोकशाहीत कोणीही मुख्यमंत्री होऊ शकतो'

नाना पटोले यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. इच्छा व्यक्त करायला हरकत नाही, पण सध्या मुख्यमंत्रिपद रिकामे नाही, असा टोला राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना हाणला. नागपुरात आयोजित कार्यक्रमासाठी आले असता ते विमानतळावर माध्यमांशी बोलत होते.

लोकशाहीत कोणीही मुख्यमंत्री होऊ शकतो. बहुमत असलेल्या पक्षाने कोणाला मुख्यमंत्री करावे, हा त्या पक्षाचा निर्णय असतो. त्यामुळे या विषयावर मी काही बोलणे योग्य नाही. सद्यःस्थितीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला बहुमत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. त्यामुळे सध्या तरी मुख्यमंत्रिपदाची जागा रिकामी नाही, असा टोला पटोले यांना हाणला.

निवडणुकांवर आताच बोलणे उचित नाही
शिवसेना आणि काँग्रेसने गेल्या काही दिवसांपासून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळ आणि आघाडीची भाषा करण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकांना अजून वेळ आहे. त्यावर आताच काही बोलणे शहाणपणाचे नाही, असे ते म्हणाले. राष्ट्रवादी- शिवसेना युती झाल्यास चमत्कार घडेल, असे संजय राऊत म्हणाले. त्यावर बोलताना पटेल म्हणाले, की हे मी आजच्या वृत्तपत्रात वाचले आहे. तर, यावर काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी निवडणुकीसंदर्भातला निर्णय हा २०२३ नंतर घेतला जाईल, असे स्पष्ट केले आहे. यामुळे यावर आताच काही बोलता येणार नाही, असे पटेल म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...