आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4500 शब्दांचा ‘पावरी भाषाकोश’ उजळणार:आदिवासी विद्यार्थ्यांचे चेहरे, बोलीतील प्रत्येक शब्दाचा दिला मराठी, हिंदी आणि इंग्रजी प्रतिशब्द

नागपूर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात कोरकू, पावरी, भिलाला व निहाली भाषांचे मिळून 75 हजार शब्दांचा शोध

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात कोरकू, पावरी, भिलाला व निहाली या आदीवासी भाषांचे मिळून 75 हजार शब्दांचा शोध व संकलन करण्यात यश आले आहे. या शिवाय साडेचार हजार शब्दांचा ‘पावरी भाषाकोश’ही तयार करण्यात आला आहे. यामुळे आदीवासी विद्यार्थ्यांना भाषा शिक्षणात मोठाच दिलासा मिळाला आहे. येत्या 7 ऑगस्ट रोजी अकोला जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे या शब्दकोशाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

संशोधन आचार्य ऋषिकेश खिलारे व संशोधन सहायक हर्षदा खिलारे यांनी हे शब्द संकलन केले आहे. गुणवत्ता असूनही आदिवासी विद्यार्थी केवळ भाषिक अडसरामुळे शालेय शिक्षणात मागे राहतात. आमदार डॉ. संजय कुटे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकारामुळे ही अडचण आता कायमची दूर होणार आहे. अडीच वर्षांच्या सखोल संशोधनातून ‘राइज फाउंडेशन’ने पाच भागात ‘पावरी भाषाकोश’ साकारला असून रविवारी 7 ऑगस्ट रोजी विश्व आदिवासी दिवसाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जामोद येथे या पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे.

सुमारे साडेचार हजार शब्दांचा समावेश असणाऱ्या या भाषाकोशमुळे पावरा समाजातील विद्यार्थ्यांना एकाच वेळी मातृभाषा, राज्यभाषा, देशभाषा अन् ज्ञानभाषा इंग्रजीतील शब्दसंग्रह उपलब्ध होणार आहे.

अकोला, अमरावती, नंदूरबार, धुळे या आदिवासीबहुल जिल्ह्यात कोरकू, भिल, पावरा, निहाल, भिलाला समाजाचे वास्तव्य आहे. या समाजातील विद्यार्थ्यांची मातृभाषा वेगळी असल्याने केवळ मराठीतील पुस्तके त्यांच्यासाठी फारशी उपयुक्त ठरत नाहीत, हे वेळोवेळी समोर येत होते. समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, त्यांना वाचनाची गोडी लागावी, याकरिता स्वतंत्रपणे विचार करणे गरजेचे झाले होते.

मेळघाटातील आदिवासी बांधवांसाठी कार्यरत ‘राइज फाउंडेशन’ने ही गरज ओळखून २०१८ मध्ये कोरकू विद्यार्थ्यांसाठी ‘ज्ञानकोश’ हा बहुभाषी शब्दकोश तयार केल्यानंतर विविध आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांकरिता त्यांच्या मातृभाषेतून पुस्तके साकारण्याची कल्पना पुढे आली. आमदार डॉ. संजय कुटे, जिल्हाधिकारी एस. राममूर्ती, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे अपर आयुक्त सुरेश वानखेडे, अकोला येथील प्रकल्प अधिकारी आर. बी. हिवाळे यांच्या पुढाकारातून 2019 मध्ये पावरा समाजातील विद्यार्थ्यांसाठी असा कोश तयार करण्याचा निर्धार करण्यात आला. तद्नंतर राइज फाउंडेशनचे संचालक आचार्य ऋषिकेश खिलारे, प्रकल्प समन्वयक हर्षदा लोंढे-खिलारे यांनी 45 गावांतील 500 पेक्षा अधिक ग्रामस्थांशी संवाद साधत अडीच वर्षे सखोल संशोधन केले.

बातम्या आणखी आहेत...