आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रद्धा वालकर हत्याकांड:फडणवीस म्हणाले - अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी अहवाल मिळवून सभागृहासमोर ठेवण्यात येईल

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोलून श्रद्धा वालकर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपी पुनावाला याला फाशीची शिक्षा होईल, याबाबत राज्यशासनाकडून प्रयत्न केले जाईल. याशिवाय अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी अहवाल मिळवून सभागृहासमोर ठेवण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धा वालकर प्रकरणी मांडलेल्या लक्षवेधीवरील चर्चेत दिले.

माणुसकीला काळीमा फासणारी घटना

श्रद्धा वालकरचे प्रकरण माणुसकीला काळीमा फासणारे आहे. या संदर्भात वेगवेगळ्या राज्यांनी लव्ह जिहाद संदर्भात केलेल्या कायद्यांचा अभ्यास राज्य सरकार करीत आहे. त्याचा अभ्यास करून आवश्यकता भासल्यास कायदा करण्याची राज्य सरकारची मानसिकता आहे असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

श्रद्धा वालकर या तरूणीची केवळ हत्त्याच नाही तर मारेकऱ्याने तिच्या मृतदेहाचे तुकडे करून फेकले. या विषयीचा प्रश्न अतुल भातखळकर यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला. श्रद्धाचा तक्रार अर्ज मागे घेण्यामागे तत्कालीन बड्या नेत्याचा दबाव पोलिसांवर होता काय? लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्याचा विचार आहे काय? असे प्रश्न भातखळकर यांनी उपस्थित केले.

लव्ह जिहाद प्रथम केरळमध्ये - फडणवीस

त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अद्यापपर्यतच्या तपासात राजकीय वा बाहेरील व्यक्तीचा दबाव आढळून आला नसल्याचे सांगितले. तक्रार करणे आणि परत घेणे यात महिनाभराचा वेळ गेला. या दरम्यान पोलिसांनी कारवाई का केली नाही, पोलिसांनी तक्रार मागे घेण्याची का वाट पाहिली याची चौकशी करण्यात येत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. इंटरफेथ मॅरेजला सरकारचा विरोध नाही. पण, एखाद्या मुलीला ठरवून फसवून लग्न केल्याच्या घटना समोर येत आहे. लव्ह जिहाद हा विषय पहिल्यांदा केरळमध्ये उघडकीस आला. या प्रकरणात राजकीय दबाव दिसून आला नाही.

शक्ती कायदाबाबत सरकारची भूमिका काय

सुनील प्रभू यांनी शक्ती कायदा आणण्याबाबत सरकारची काय भूमिका आहे? आंतरधर्मीय विवाह समन्वय समितीवर अनेक आक्षेप आहेत. भाईंदर पोलिसही अशा एका अंकिता बुगडीया प्रकरणाकडे दुर्लक्ष करीत आहे, याकडे प्रभू यांनी लक्ष वेधले.

गुड टच आणि बॅड टचचे प्रशिक्षण - फडणवीस

उपमुख्यमंत्र्यांनी मुलींना शाळेत गुड टच व बॅड टचचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे सांगितले. शक्ती कायद्याचा पाठपुरावा सुरू आहे. लवकरच केंद्राकडून कायदा मंजूर करून आणू. आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती लव्ह जिहादसारखी प्रकरणे सोडवण्यासाठी असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. अबू आझमी यांनी लव्ह जिहाद नाव देऊन एका समुदायाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. वेस्टर्न कल्चरच्या प्रभावाने लव्ह इन रिलेशनपिसारखी प्रकरणे होत असल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...