आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:भंडाऱ्यामध्ये ट्रान्सफॉर्मरला चिकटून शेतकऱ्याचा मृत्यू

भंडाराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कृषीचा वीजपुरवठा खंडित असल्याने तो सुरू करण्यासाठी चढलेल्या एका शेतकऱ्याचा ट्रान्सफॉर्मरवर चिकटून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना लाखांदूर तालुक्यातील चिचोली शेत शिवारात शुक्रवारी घडली.

शरद यादोराव धोटे (३० रा. भागडी ता. लाखांदूर) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मृत शरद धोटे यांची वडिलोपार्जित शेती नदीच्या पैलतीरी असलेल्या चिचोली येथे आहे. शेतात कृषी पंप असून सकाळी वीज पुरवठा सुरू झाला होता. मात्र, एक फेज बंद असल्याने मृताच्या शेतीच्या परिसरातील कृषी पंपांचा वीज पुरवठा बंद होता. त्यामुळे शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी ते ट्रान्सफॉर्मरवर चढले. मात्र, ट्रान्सफॉर्मरचा वीज पुरवठा एबी स्विच बंद न केल्याने सुरू होता. दरम्यान, ही बाब मृत शरदच्या लक्षात आली नाही आणि ट्रान्सफॉर्मरवर चढल्यानंतर त्याला विजेचा धक्का बसला. त्यातच तो ट्रान्सफॉर्मरला चिटकला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. काही वेळानंतर त्यांचा मृतदेह खाली उतरवण्यात आला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...