आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासद्यस्थितीत कापसाचे जगातील बाजारातील भाव हे 1994-95 मध्ये मिळालेल्या दरापेक्षाही कमी आहेत. भारतातील शेतकऱ्यांना सध्या 8 ते 8 हजार 500 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे, तो केवळ डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन झाल्यामुळे आहे.
गेल्यावर्षी अमेरिकेतील शेतकऱ्यांनी 1 डॉलर 70 सेंटमध्ये प्रतिपाउंड रुईची विक्री केली. आज त्यांना केवळ एक डॉलरचा भाव मिळत आहे, तरीही तेथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होत नाहीत, असा खडा सवाल शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या खुल्या पत्रात विचारला आहे.
परिस्थिती बदलली
जगातील बाजारात मंदीचे वातावरण असल्याने यंदा भारतातून कापूस आणि सोयाढेपेची (डीओसी) निर्यात थांबलेली आहे. अमेरिकेच्या कापूस बाजारात 1995 मध्ये एक पाउंड रुईची (कॉटन लिंट) किंमत ही 1 डॉलर 10 सेंट इतकी होती. त्यावेळी भारतातील शेतकऱ्यांना कापसाचे 2 हजार 500 ते 2 हजार 700 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाले होते. कापसाची आधारभूत किंमत केवळ 1 हजार 200 रुपये प्रति क्विंटल होती आणि एक डॉलरचा विनिमय दर हा 32 रुपये होता. आता परिस्थिती बदलली आहे.
विजय जावंधियांनी वेधले लक्ष
भारतातील शेतकऱ्यांना कापसाचे 8 हजार ते 8 हजार 500 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहेत. रुपयाचे अवमूल्यन झाल्यामुळेच हे दर मिळत आहेत. आज एक डॉलरचा विनिमय दर हा 82 रुपये आहे. केंद्र सरकारने तर कापसाची किमान आधारभूत किंमत केवळ 6 हजार 300 रुपये प्रति क्विंटल इतकीच ठरवली आहे, याकडे विजय जावंधिया यांनी लक्ष वेधले आहे.
कापसाचे दर कोसळतील
विजय जावंधिया यांनी पत्रातून भीती व्यक्त केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे, साखरेप्रमाणे कापसाच्या निर्यातीला देखील प्रोत्साहन द्यायला हवे, अशी विनंती आपण याआधीच्या पत्रातून केली होती. कापसाच्या गाठींची निर्यात झाली नाही, तर देशात कापसाच्या गाठी शिल्लक राहतील आणि त्यामुळे कापसाचे दर कोसळतील.
फाईव्ह-एफ संकल्पना
आपण ‘फाईव्ह-एफ’ची संकल्पना शेतकऱ्यांसमोर मांडली होती. त्यात फार्म, फायबर, फॅब्रिक, फॅशन आणि फॉरेन या दुव्यांचा उल्लेख केला होता. शेतमालावरील प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि निर्यातीचा हा प्रवास शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक ठरू शकतो. ही आपलीच योजना आहे, पण दुर्दैवाने आज कापसाचे भाव कमी झाले आहेत. निर्यात देखील कमी झाली आहे. मात्र, कापडाचे दर कमी होऊ शकले नाहीत. एक लाख खंडी रुईचे भाव हे 62 हजार रुपये खंडीपर्यंत घसरले आहेत. हा नफा कुठे जात आहे?, असा प्रश्न जावंधिया यांनी केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.