आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोणतेही कृषी उत्पादन देशांत हमीभावापेक्षा कमी किमतीत आयात होणार नाही याबाबत घोषणा करा अशी मागणी करणारे पत्र कृषी प्रश्नांचे अभ्यासक विजय जावंधीया यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना लिहिले आहे. महागाई आणि हमीभावाच्या मुद्द्यावरून देशातील सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करणे बंद करावे, असे जावंधीया यांनी सुनावले आहे.
डाॅलरच्या तुलनेत रूपयाची किंमत घसरत जाईल. त्या तुलनेत वेतन आयोगानुसार वेतनात वाढ होईल. त्या तुलनेत कृषी उत्पादनांचे भाव वाढले नाही तर सबका साथ सबका विकास कसा होईल? असा सवालही जावंधीयांनी उपस्थित केला आहे. नरेंद्र मोंदी पंतप्रधान होण्यापूर्वी रूपयाच्या अवमूल्यनावर टीका करीत होते. 2014-15 मध्ये एका डाॅलरचा दर 545-55 रूपये होता. आज 2022 मध्ये 79-80 रूपये दर आहे. डाॅलरच्या अवमूल्यनामुळेच रूपयाचे दर एका डाॅलरला 79-80 रूपये आहेत. अन्यथा ते 100 रूपये असते. याकडे जावंधीयांनी लक्ष वेधले आहे.
यंदा कापूस, सोयाबीनला चांगले भाव
केंद्रात काँग्रेस सरकार असताना मध्य प्रदेशात शिवराज सिंह आणि छत्तीसगढमध्ये डाॅ. रमण सिंग हे भाजपा मुख्यमंत्री गहु आणि धान्य खरेदी प्रति क्विंटल 150 ते 200 रूपये बोनस देऊन खरेदी करीत होते. परंतु पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून बोनस देऊन खरेदी न करण्यास सांगितले, याकडे लक्ष वेधले आहे. यावर्षी कापूस, सोयाबीनला चांगले भाव मिळाले.
जागतिक बाजारात कापसाचे दर घसरले
कापसाला 12 हजार रूपये प्रति क्विंटल तर सोयाबीनला 5 ते 9 हजार रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ उताराचा देशातंर्गत कृषी उत्पादनाच्या भावांवर परिणाम होतो. यावर्षीचे पीक अजून बाजारात यायचे आहे. ऑक्टोबरपर्यंत बाजारात येण्यास सुरूवात होईल. परंतु जागतिक बाजारात कापसाचे दर पडणे सुरू झाले आहे. त्यामुळे यावर्षी भाव मिळेल की नाही ही शंका आहे, असे ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.