आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागडचिरोलीमध्ये उन्हाळी धानपिकाला पाणी देण्यासाठी शेतावर गेलेल्या एका महिलेला वाघाने ठार केले, तर चंद्रपूर शहराजवळील दुर्गापूर येथे धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी पहाटे जेरबंद केले.
गडचिरोलीतील आरमोरी तालुक्यातील अरसोडा गावशिवारात शेतावर गेलेल्या एका महिलेला वाघाने ठार केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ७ च्या सुमारास घडली. नलू बाबूराव जांगडे (३५) असे मृत महिलेचे नाव आहे. पती आजारी असल्याने नलू शेतावर गेली होती. मात्र, बांधाआड दडून बसलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला करत ठारल केले. ही बातमी कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तेथेच असलेल्या वाघाला आरडाओरड करून नागरिकांनी पिटाळले. वनाधिकाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला.
सीटी १ वाघ वन विभागाच्या दृष्टिपथात : ताडोबातील शार्प शूटरचे पथक ८ दिवसांपासून वडसा वन विभागात सीटी-१ वाघाचा शोध घेत आहे. हा वाघ उसेगाव परिसरातच असून दृष्टिपथात आहे. शुक्रवारी तो सापळ्यातील बकरी खाऊन गेला.
दुसऱ्या घटनेत चंद्रपूरजवळील दुर्गापूर येथे बिबट्याने अनेकांचे बळी घेऊन परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला होता. मागील दोन महिन्यांत या बिबट्याने लहान मुलांसह ६ ते ७ जणांवर हल्ला करून ठार केले. काहींना गंभीर जखमी केले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना घेराव घालून बिबट्याला मारण्याची मागणी केली होती. वन विभागाने त्या बिबट्याला ठार करण्याचे आदेशही दिले होते. वन विभागाने त्या बिबट्याला पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू केली असतानाच शुक्रवारी पहाटे ४ वाजता त्या बिबट्याला दुर्गापूर जंगलातून जेरबंद करण्यात आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.
चंद्रपुरात बिबट्याला केले जेरबंद
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.