आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन कराव्या:अ‍ॅग्रोव्हिजन फाऊंडेशनच्या चर्चासत्रात गडकरींचे आवाहन

नागपूर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्याकडे प्रतिभा (टॅलेंट) आणि क्षमता असूनही अपेक्षित यश मिळत नाही. त्यासाठी काय करायला पाहिजे याचा विचार शेतकऱ्यांनी करावा. तसेच नवीन तंत्रज्ञान उपलब्ध व्हावे, शेतमालाला योग्य भाव आणि बाजारपेठ मिळावी यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन कराव्या, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

अ‍ॅग्रोव्हिजन फाऊंडेशनतर्फे हॉटेल सेंटर पॉईंट येथे आयोजित एका चर्चासत्रात ते बोलत होते. याप्रसंगी रवींद्र ठाकरे, डॉ. सी. डी. मायी, रवी बोरटकर, आनंद राऊत, रमेश मानकर आदी उपस्थित होते. विदर्भातील शेतकऱ्यांनीही आपले यशस्वी प्रयोग तयार केले पाहिजे. उत्पादनापासून दर्जापर्यंत, मॅकेनायझेशनपासून पॅकेजिंगपर्यंत सर्वच ठिकाणी आपण संघटीत व्हावे लागेल. तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपल्या गावात रोजगार निर्माण करतानाच उत्पादकता वाढविली पाहिजे. प्रत्येक तालुक्यात किमान 5 नर्सरी सुरू केल्या पाहिजे. त्या नर्सरीमध्ये अनेक प्रकारची रोपे तयार झाली तर त्यातून क्रांती होईल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

स्वत:च्या पायावर उभे राहा

फार्मर प्रोड्युस कंपन्यांची नोंदणी झाल्यानंतर भारत सरकार व महाराष्ट्र सरकारच्या कोणत्या योजनांचा फायदा शेतकऱ्यांना घेता येईल, ते ठरवावे लागेल. आपण आपल्या उत्पादनाचे मार्केटिंग केले आणि उत्तम दर्जा ठेवला तर डिपार्टमेंटल स्टोअर्समध्येही आपल्या उत्पादनाला भाव मिळेल. आंतरराष्ट्रीय बाजार आणि डिपार्टमेंटल स्टोर अशा दोन्ही ठिकाणी आपल्याला आपला माल विकता येणार आहे. स्वत:च्या पायावर उभे राहा. 1500 कोटींची वार्षिक उलाढाल करणाऱ्या नाशिकच्या विलास शिंदेसारखे शेतकरी विदर्भात निर्माण झाले पाहिजे.

गडकरींकडून हिरवा कंदील

तंत्रज्ञानाचा उपयोग करून उत्पादन खर्च कमी करणे, मालाचा दर्जा उत्तम ठेवणे, आकर्षक पॅकेजिंग व नंतर मार्केटिंग अशी चेन आहे. या चेनमध्ये आपण सहभागी झाले पाहिजे. शेवटी शेतकऱ्याची प्रगती आणि विकास आपल्याला साधायचा आहे. त्यासाठी प्रशिक्षण, यशस्वी प्रयोग करण्यामुळेच उन्नती साधता येईल, असेही गडकरी म्हणाले. कापूस पीक पोषण अभियानाच्या वाहनाला गडकरी यांनी हिरवी झेंडी दाखविली.

बातम्या आणखी आहेत...