आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:कृषी खटल्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करा, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

प्रतिनिधी| चंद्रपूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अप्रमाणित कृषी निविष्ठा (बी - बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके) आढळल्यास संबंधित कंपनी व विक्रेत्याविरुद्ध खटले दाखल करण्यात येतात. सदर खटले निकाली काढण्यासाठी ५ ते १० वर्ष लागत असल्याने शेतकऱ्यांना न्याय मिळण्यास विलंब होतो. त्यामुळे सदर खटले त्वरित निकाली काढण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याची मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

राज्यातील तपासणी प्रयोगशाळेत सादर केल्यानंतर सदर नमुने अप्रमाणित आढळल्यास वरील कायद्यान्वये संबंधित कंपनी व विक्रेत्याविरुद्ध न्यायालयीन खटला त्या क्षेत्रातील न्यायालयात दाखल करण्यात येतो. खटल्याचा निकाल येण्यास ५ ते १० वर्षे लागतात, असेही त्यांनी सांगितले.