आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हल्ला:भंडाऱ्यात ‘दिवाळी हंगामा’ कार्यक्रमात उपसभापतींसह चौघांवर जीवघेणा हल्ला

भंडाराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळी निमित्त भंडारा तालुक्यातील सिल्ली येथे मंगळवारी हंगामा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हुल्लडबाजी करणाऱ्या युवकांना समजावण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला. यावरून झालेल्या वादानंतर भंडारा पंचायत समितीचे उपसभापती यांच्यासह अन्य आयोजकांवर लाठ्याकाठ्यांनी प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना मध्यरात्री घडली. या घटनेत चार जण जखमी झाले असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणात आशिष पडोळे (२५), कमलाकर अहिर (४२), निखिल पाणबुडे (२८), अक्षय साखरवाडे (२५) यासह एका १६ वर्षीय अल्पवयीन बालकाला अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, जखमींमध्ये प्रशांत खोब्रागडे (५२) यांच्यासह राजेंद्र साखरवाडे (३४), प्रशांत माकडे (२७), १२ वर्षीय आदेश देशमुख यांचा समावेश आहे. भंडारा तालुक्याच्या सिल्ली गावात दिवाळीनिमित्त मंगळवारी रात्री ग्रामीण लोककलेचा ‘हंगामा कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रम बघण्यासाठी आलेल्या काही तरुणांनी हुल्लडबाजी करायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांना समजावण्याचा प्रयत्न करण्यासाठी भंडारा पंचायत समितीचे उपसभापती प्रशांत खोब्रागडे व आयोजक त्यांच्याजवळ गेले. यावरुन दोन गटात सुरुवातीला शाब्दिक वाद सुरु झाला. त्यानंतर दोन्ही गटात राडा होऊन त्या तरुणांनी मोठ्या लाठ्याकाठ्यांनी आयोजक आणि उपसभापती यांना मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच कारधाचे ठाणेदार राजेशकुमार थोरात हे आपल्या पोलीस पथकासह गावात पोहचले.त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने लागलीच जखमीना भंडारा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.या प्रकरणी जखमी प्रशांत खोब्रागडे यांच्या तक्रारीवरून कारधा पोलिसांनी आशिष पडोळे, कमलाकर अहिर, निखिल पाणबुडे, अक्षय साखरवाडे यांच्यासह एका वर्षीय अल्पवयीन बालकावर गुन्हा नोंद करत त्यांना अटक केली असून अधिक तपास ठाणेदार थोरात यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत मिसाळे करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...