आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टायर कंपनीला भीषण आग:तेलामुळे आग प्रचंड वेगाने वाढली

नागपूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमरेड तालुक्यात हिंगणा एमआयडीसीतील आरबीसी इंडस्ट्री या टायर कंपनीला गुरुवारी भीषण आग लागली. जुने टायर जाळून या कंपनीत तेल काढण्यात येते. तेलामुळे आग प्रचंड वेगाने वाढली. या आगीत कंपनीतील सर्व टायर जळून खाक झाले आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समजले नाही.

माहितीनुसार सुशीलकुमार व्यास यांच्या मालकीच्या आरबीसी कंपनीला रात्री १२ वाजेच्या सुमारास लागलेली आग इतकी भीषण होती की दुपारपर्यंत आग चांगलीच धुमसत होती. पॅकेजिंग विभागात अल्कोहोल व वॅक्स हे पदार्थ असल्याने आग वेगाने भडकली. आगीवर फोमचाही मारा करण्यात आला होता. मात्र, अल्कोहोलमुळे त्याचा तितका प्रभाव पडला नाही व आग भडकतच राहिली. आगीमुळे तयार झालेल्या उष्णतेमुळे कंपनीची स्टोअरेज इमारत कोसळली. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आगीपर्यंत पोहोचणे अवघड झाले होते. जेसीबीच्या मदतीने मलबा बाजूला केल्यानंतर आग विझविण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...