आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप-लेकाचा मृत्यू:वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या कुटुंबातील बाप लेकाचा तलावात बुडून मृत्यू, स्थानिकांकडून आईला वाचवण्यात यश

नागपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाढदिवस साजरा करण्यास गेलेल्या बाप-लेकाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना हिंगणा तालुक्यातील मोहगाव झिल्पी तलावात घडली. अब्दुल असिफ अब्दुल गणी आणि अब्दुल चाहबील अब्दुल आसिफ ही मृत बापलेकाची नावे आहे.

नागपूर शहरातील यशोधरा नगर मधील टिपू सुलतान चौक निवासी कुटुंब दुचाकीने सोमवारी दुपारी साडेअकरा वाजताच्या दरम्यान वाढदिवस साजरा करण्यासाठी हिंगणा तालुक्यातील मोहगाव झिल्पी तलावावर दुचाकीने आले. पती पत्नी व दोन मुले सोबत होती. त्यातील एका मुलाचा वाढदिवस होता. वाढदिवस साजरा केल्यानंतर बाप-लेक मोहगाव तलावातील पाण्यात उतरले. पाण्यातील गाळात फसल्याने ते पाण्यात बुडाले. हे पाहून पत्नीही तलावात उतरली.

तलावावर उपस्थित असलेल्या काही जणांना हे दृश्य दिसले. यामुळे पत्नीला वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले. मात्र दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मृत्यू पावलेल्या वडिलांचे वय ३२ असून मुलाचे वय १२ आहे. हिंगणा पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.दोन्ही मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आल्यानंतर शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...