आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळी अधिवेशन:हिवाळी अधिवेशनात अधिकारी व नेत्यांसाठी चित्रपटांची मेजवानी

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिवाळी अधिवेशनानिमित्त संपूर्ण राज्यातून येथे आमदारांसह वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी तसेच संपूर्ण राज्यातून आयएएस, आयपीएस, सरकारी व निमसरकारी सेवेतील अधिकारी येथे मुक्काम ठोकून असतात. त्यांच्यासाठी विशेष दहा मराठी चित्रपट दाखवणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी दिली. यावेळी कलाकारांशी ऑनलाईन संवादही घडवून आणला जाईल.

अधिवेशन कालावधीत आमदार निवासासह इतर ठिकाणी कार्यकर्ते राहतात, तर अधिकारी आपापल्या व्यवस्थेने येतात. सर्वाधिक वावर सिव्हिल लाईन परिसरात असतो. आमदार निवास परिसरातच एक तात्पुरते चित्रपटगृह उभारले आहे. या चित्रपटगृहात उद्या सोमवार १९ डिसेंबरपासून हे चित्रपट दाखविण्यात येणार आहे. यामध्ये “हरिश्चंद्राची फॅक्टरी’, “दुनियादारी’, “जैत रे जैत’, “नटसम्राट’, “टाईमपास’, “सैराट’, “मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, “पावनखिंड’, “हवाहवाई’, “शेर शिवाजी’, “गोष्ट छोटी डोंगरा एवढी’, “सिंहासन’ आदी चित्रपट दाखवण्यात येणार आहे.

वायफाय, इंटरनेट, १५० जणांची कार्यशाळा या एमडीएमटीमध्ये व्हिडिओ काॅन्फरन्सिंगची सोय असून ते वायफाय, इंटरनेटने जोडले आहे. यात १५० जणांची कार्यशाळा, मिनी कॉन्फरन्स घेता येते. सरकारच्या भागीदारीत अनेक उपक्रमाची अंमलबजावणी करता येते असे चौधरी यांनी सांगितले. एमडीएमटीत सेम डे रिलीज चित्रपट दाखवता येतो. या शिवाय सरकारी योजनांचा प्रसारही करता येतो. विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचे व्हिडिओही पाहू शकतात.

बातम्या आणखी आहेत...