आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण आग:चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील कोल हँडलिंग प्रकल्पाच्या क्रशर हाऊसमध्ये आग, वीजनिर्मितीवर परिणाम होणार नसल्याचा दावा

नागपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील कोल हँडलिंग प्लांटच्या क्रशर हाऊसमध्ये रविवारी मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत संच क्रमांक 8 आणि 9 मध्ये कोळसा घेऊन जाणारा कन्व्हेअर बेल्ट जळाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. ही आग भीषण असल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या चार गाड्यांनी आग नियंत्रणात आणली.

आगीचे नेमके कारण कळू शकले नाही तरी मिळालेल्या माहितीनुसार, ही आग शॉर्ट सर्किटने लागण्याची शक्यता आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र हे वीज निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. येथे वीज निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात कोळसा लागतो. रविवारी रात्री संच क्रमांक 8 आणि 9 हे मेंटेनन्ससाठी बंद ठेवण्यात आले होते. यादरम्यान वीजपुरवठा खंडित झाला होता. याच वेळी आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत कोळसा वाहून नेणारे दोन कन्व्हेअर बेल्ट जळून गेले. यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.

थर्मल पॉवर प्लांटचे मुख्य कार्यकारी अभियंता पंकज सपाटे यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे आग नियंत्रणात आली असून प्लांट मध्ये मोठ्या प्रमाणात कोळशाच्या बफर स्टॉक आहे, त्यामुळे या आगीचा वीजनिर्मितीवर परिणाम होणार नाही. नुकसान किती झाले या बद्दलचा अंदाज लगेच येणार नसल्याचे सपाटे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...