आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसली ही थट्टा:महाकालीनगर झोपडपट्टीला आग; 60 रुपयांची मदत द्यायलाही दीड महिना, नागरिकांत तीव्र संताप

नागपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नागपुरातील महाकालीनगर झोपडपट्टीत 9 मे रोजी आग लागली हाेती. मात्र, झोपडपट्टीवासीयांना केवळ 60 रुपयांची मदत देण्यास दीड महिना लागला. त्याबद्दल नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

बेलतरोडी भागातील झोपड्यात राहणाऱ्या शेकडो लोकांना मदत म्हणून केवळ 60 रुपये प्रतिव्यक्ती मदत दिली जाते. ही मदत मिळण्यासाठी दीड महिना लागल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दक्षिण नागपुरातील बेलतरोडी परिसरातील महाकाली नगर झोपडपट्टीत 9 मे रोजी सिलेंडरच्या स्फोटोमुळे आग लागली होती. दाट लोकवस्तीमुळे क्षणार्धात आग सर्वत्र पसरून मोठे नुकसान झाले. होते नव्हते ते सर्व आगीत भस्मसात झाले होते. बेघर झालेल्या कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. या संकटात त्यांना मदत व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार ही झोपडपट्टी अवैध आहे. मात्र नुकसान झाल्यामुळे त्यांनाही मदत मिळावी यासाठी खावटी योजनेंतर्गत प्रस्ताव पाठविण्यात आला होता. एक महिन्यासाठी प्रति व्यक्ती प्रति दिन 60 रुपये अशी मदत या योजनेंतर्गत दिली जाते. आतापर्यत 103 कुटुंबांना या मदतीचे वितरण करण्यात आले असल्याचे उपसरपंच जितेंद्र चांदुरकर यांनी सांगितले.

झोपडपट्टीवासियांसाठी नवीन घरे

आगीच्या दुर्घटनेनंतर अनेक संस्था व संघटनांनी झोपडपट्टीतील नागरिकांना मदत केली. आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनीही दिलेल्या 4 लाखांच्या मदतीचेही वाटप करण्यात आले. प्रती कुटुंब 4 हजार रुपयांचे वितरण करण्यात आल्याचे चांदुरकर यांनी सांगितले. येथे राहणाऱ्या नागरिकांनी आगीत जळून खाक झालेली घरे पुन्हा बांधली. काहींनी तर येथे पक्की घरेही बांधली. शासनाकडून मिळणारी मदत तोकडी असल्याचेही चांदुरकर म्हणाले.