आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नागपूर:फायर सेफ्टी ऑडिट खर्चिक, अर्थसंकल्पात तरतूद करणार; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

अतुल पेठकर | नागपूर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शासकीय रुग्णालयांसह अन्य आरोग्य संस्थांमध्ये असलेल्या विविध प्रकारच्या वैद्यकीय विद्युत उपकरणांचे परीक्षण करणार

शासकीय रुग्णालयांचे “फायर सेफ्टी ऑडिट’ हे महिना-पंधरा दिवसांत होणारे काम नाही. याशिवाय हे खूप खर्चिक काम आहे. यासाठी खूप पैसेही लागणार आहेत. यासाठी स्वतंत्र अर्थसंकल्पीय तरतूद आवश्यक असून तसा प्रस्ताव अर्थमंत्रालयाला सादर केला आहे. येत्या बजेटमध्ये त्याला मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. तशी मंजुरी मिळाल्यास येत्या मार्च-एप्रिलपासून लगेचच कामाला सुरुवात करू, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

८ जानेवारीच्या मध्यरात्री रुग्णालयाच्या शिशू केअर अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीत दहा बाळे होरपळून दगावली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांपासून आरोग्यमंत्र्यांपर्यंत किमान डझनभर मंत्र्यांनी रुग्णालयाला भेट दिली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व रुग्णालयांचे “फायर सेफ्टी ऑडिट’ करण्याची घाेषणा केली होती. या घोषणेनंतर राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये “फायर सेफ्टी ऑडिट’ व वैद्यकीय विद्युत उपकरणांचे “इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट’ करण्याचे आदेश राज्याच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकांनी जिल्हा शल्यचिकित्सकांसह सर्व जिल्ह्यांमधील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र महिना उलटूनही अद्याप एकाही रुग्णालयाचे फायर ऑडिट झालेले नाही. यामागे पैशाची चणचण असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विद्युत उपकरणांचेही परीक्षण

शासकीय रुग्णालयांसह अन्य आरोग्य संस्थांमध्ये अतिदक्षता विभाग (आयसीयू), एचडीयू, एसएनसीयू, ऑक्सिजन युनिट, इतर कक्षांमध्ये असलेल्या विविध प्रकारच्या वैद्यकीय विद्युत उपकरणांचे ‘सेफ्टी ऑडिट’ करण्यात येईल. सर्व उपकरणांची दुरुस्ती व जिल्हा अग्निशमन प्राधिकरणांच्या मदतीने राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांना फायर सेफ्टीबाबत प्रशिक्षण देण्यात येईल तसेच वर्षातून एकदा मॉक ड्रिल करण्यात घेण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...