आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रपूर:पाच चोरांना अटक; 15 दुचाकी जप्त, चंद्रपूर गुन्हे शाखेने विशेष मोहीम

चंद्रपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रपूर गुन्हे शाखेने विशेष मोहीम राबवून पाच कुख्यात दुचाकीचोरांना अटक केली असून त्यांचेकडून १५ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई बुधवारी करण्यात आली.

प्रदीप संजय शेरकुरे (२४) रा. पारधी गुडा धोपटाळा ता. कोरपना, विजय देवगडे (३०) रा. पारधीगुडा खैरगाव, राजेंद्र नानाजी काळे (२९) रा. पारधीगुडा लक्कडाकेट ता. राजुरा, रोशन अशोक गोबाडे (२७) रा. देलनवाडी ता. सिंदेवाही, विपुल प्रभाकर मेश्राम (२४) रा. सायमारा ता. सावली असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

ही कारवाई चंद्रपूर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांचे नेतृत्वात सहा.पोलिस निरीक्षक मंगेश भोयर, पोलिस उपनिरीक्षक अतुल कावळे, सहा. फौजदार राजेंद्र खनके, हवालदार स्वामीदास चालेकर, संजय आतंकुलवार, सुरेंद्र मोहंतो, चंद्रकांत नागरे, मिलिंद चव्हाण, जमीर पठाण, नितेश महात्मे, अनुप डांगे, संतोष येलपूलवार, गोपाल आतकुलवार, मयुर येरणे, प्रसाद धुलगंडे, प्रमोद कोटनाके, गणेश भोयर, गणेश मोहुर्ले, संदीप मुळे, प्रशांत नागोसे यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...