आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरणपूरक गणेशोत्सव:पाच हजार शालेय विद्यार्थ्यांच्या मेहनतीतून आकार घेणार मातीच्या गणेश मूर्ती

नागपूर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशनतर्फे नागपूर येथील सुमारे दहा शाळांमध्ये 5 हजार विद्यार्थी पर्यावरणपूरक मातीच्या गणेश मूर्ती घडवणार आहे. येत्या 31 आॅगस्ट रोजी गणेश स्थापना आहे. पीओपी मूर्ती पर्यावरणाला हानीकारक असल्यामुळे मातीच्या गणेश मूर्ती घडवणार असून विद्यार्थी या मूर्ती त्यांच्या घरी स्थापन करतील असे प्रकल्प समन्वयक योगेश बन यांनी सांगितले.

पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि मध्य नागपुरातून शाळांची निवड केली जाईल. या शाळेत विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे प्रशिक्षण देऊन श्री गणेश मूर्तीची निर्मिती करण्यात येणार असल्याचे ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष अनिल सोले यांनी सांगितले.

निवड केलेल्या शाळांत मूर्तीकार पाठवणार आहे. संबंधित शाळेतील चित्रकला शिक्षक विद्यार्थ्यांना मदत करील. विद्यार्थ्यांना माती, ब्रश, रंग, पाटी संस्थेतर्फे दिली जाईल. प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी "ग्रीन गणेशा' म्हणजेच "मातीतूनच घडवा गणेशमूर्ती' हा संदेश देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केल्याचे बन यांनी सांगितले. उपक्रमाच्या जनजागृतीसाठी व प्रत्येक शाळेशी सम्पर्क करण्यासाठी पर्यावरण प्रेमींची टीम तयार केली आहे.

या संबंधीची माहिती एका बैठकीत देण्यात आली. या बैठकीत माजी उपमहापौर संदीप जाधव, प्रा. कुणाल पडोळे, योगेश बन, प्रा. राजेश गादेवार, अनिल शिवणकर, आशिष वांदिले, प्रदीप बिबटे, बबली मेश्राम, वरुण गजभिये, कपिल फुलझेले, राम मुंजे, भोलानाथ सहारे, शैलेश ढोबळे, महेंद्र राऊत, राजू कनाते, राजू भोम्बाटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...