आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे फलाटावर साप निघाल्याने पळापळ:प्रवाशांची उडाली तारांबळ; साप बिळात शिरल्याने लोकांनी घेतला मोकळा श्वास

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वेगाडीची प्रतीक्षा करत फलाटावर वाट पाहात असलेल्या प्रवाशांना अचानक साप दिसल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. रविवारी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने काही काळ प्रवासी चांगलेच घाबरले होते. नंतर साप परिसरातीलच एका बिळात घुसल्याने प्रवाशांनी मोकळा श्वास घेतला.

नेमके झाले काय?

जबलपूर एक्सप्रेसमध्ये बसण्यासाठी प्रवासी येत होते. अचानक मोठा साप तेथे आला. त्यांची लांबी सुमारे चार फूट होती. साप बघून प्रवासी भयभीत झाले. प्रवाशांची पळापळ सुरू झाली. एका प्रवाशाने रेल्वे प्रशासनाला कळवले. पण कोणीही सर्प मित्राला बोलवले नाही. साप रेल्वेस्थानकावरील एका बिळात शिरला. नागपूर रेल्वेस्थानकावर मोठ्या प्रमाणात उंदीर आहेत. तसेच येथे सापही मोठ्या प्रमाणात दिसून येतात. यापूर्वी देखील साप निघाल्याच्या घटना घडल्या आहे. साप पकडून त्याला जंगलात सोडण्यात आले नाही. त्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत.यापूर्वी 19 जुलै 2021 रोजी नागपूर रेल्वेस्थानकावर धो धो पाऊस कोसळत असताना आणि प्रवासी चढण्या-उतरण्याच्या तयारीत असतानाच दारासमोरच फलाटावर भला मोठा साप दिसला होता.

प्रवाशांची तारांबळ

सारेच भयभीत असतानाच लोहमार्ग पोलिस दलातील शिपाई श्रीकांत उके घाईघाईत पोहोचले आणि सापाला अलगद उचलून घेतले. हा थरारक प्रसंगही रात्री अजनी स्थानकावर घडला होता.त्यावेळी रात्री साडेआठच्या सुमारास हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेस अजनी स्थानकाच्या फलाट क्रमांक 2 वर येऊन थांबली होती. आतील प्रवासी खाद्य पदार्थ घेण्यासाठी खाली उतरले. तर बाहेरचे प्रवासी आत चढत होते. एस-11 क्रमांकाच्या डब्यातील प्रवासीही खाली उतरण्याच्या बेतात असताना समोरच भला मोठा साप दिसला. अनेकांनी आरडाओरड केली. भीतीपोटी काहीजण डब्याबाहेर पडले. त्यावेळी घटनेची माहिती मिळताच स्टेशन व्यवस्थापक माधुरी चौधरी यांनी सर्पमित्र आणि पोलिस शिपाई श्रीकांत उके यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला होता. दहा मिनिटाच्या आत श्रीकांत यांनी स्टेशनवर पोहोचून क्षणाचाही विलंब न करता सापाला पकडून प्रवाशांना दिलासा मिळाला होता.

बातम्या आणखी आहेत...