आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दर पावसाळ्यात पुरामुळे मुंबईची तुंबई होते. यामुळे मालमत्तेचे अपरिमित नुकसान होते. याशिवाय जनजीवनावरही गंभीर परिणाम होतात. पुराच्या पाण्यामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढते तर बॅकवाॅटरमुळे सांडपाणी शहरात शिरते. यावर तातडीने उपाय करणे आवश्यक असल्याचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
आपल्याकडे असलेल्या नगर विकास मंत्रालयामार्फत ही सर्व कामे करता येतील. मुंबईतील पुराचे तसेच सांडपाणी ठाण्याकडे वळवले जाऊ शकते. हे पाणी एका धरणात साठवून ठेवता येईल. यावर प्रक्रिया करून ते जवळपासच्या शहरातील उद्योग तसेच सिंचनासाठी वापरता येईल. अतिरिक्त पाणी राज्यातील दुष्काळी भागाकडे वळवून शेतीसाठी वापरता येईल. असेही त्यांनी म्हटले आहे.
संपूर्ण मुंबईत सिमेंट रोड करा
मुसळधार पावसामुळे रस्त्यांचे खूप नुकसान होते. याचा त्रास सामान्यांना होतो. डांबरी रस्ते पुराच्या पाण्याचा ताण सहन करू शकत नाहीत. त्यामुळे ते जागोजागी उखडतात व खड्डे पडतात. याउलट मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेचे आहे. दोन दशकांपूर्वी बांधलेला हा महामार्ग आजही सक्षम आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण मुंबईत सिमेंट रोड बांधून ते ड्रेनेज सिस्टिमशी जोडता येतील. त्यामुळे सांडपाण्याचाही निचरा होईल व मुंबईची तुंबई होणार नाही, असे गडकरींनी पत्रात म्हटले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.