आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे नागपूरसह विदर्भात नद्या नाल्यांना पूर आला असून विदर्भात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतीपिकांनाही याचा मोठा फटका बसला असून विशेषत: सोयाबीन आणि कापूस हातचे जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून विदर्भात मुसळधार पाऊस सुरू आहे. भंडारा, गोंदीया, चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यात नद्या फुगल्या आहे. कन्हान नदीला आलेल्या पुरामुळे आजूबाजूच्या गावात पूराचे पाणी शिरले. तर सावनेर तालुक्यातील कोल्हार नदीला आलेल्या पूराचे पाणी पटकाखेडी व आगेवाडाच्या पुलावरून वाहात आहे. त्यामुळे हे मार्ग बंद झालेले असले तरी काही लोक जीव धोक्यात घालून नदी पार करीत आहे. भंडारा जिल्ह्यात वडेगाव ते आंधळगाव मार्गावरील नाल्यावर पाणी असल्याने हा मार्ग बंद झाला आहे.
गेल्या 24 तासात विदर्भात गोंदीया जिल्ह्यात सर्वाधिक 73.2 मिमी इतका पाऊस झाला. नागपूर जिल्ह्यात 60 मिमी, वर्धा 43.4, यवतमाळ 32.6, अमरावती 32.8 मिमी, अकोला 22.9, बुलढाणा 22 मिमी पाऊस झाला. चंद्रपूर, गडचिरोली व वाशिम जिल्ह्यात पावसाने मेहेरबानी केली. प्रादेशिक हवामान केंद्राने उद्या 30 ऑगस्टपासून वातावरण सामान्य राहाण्याचा अंदाज वर्तवला आहे. बावनथडी प्रकल्पाचे सहा दरवाजे प्रत्येकी 1.05 मीटरने उघडण्यात आले असून धरणातून 1076 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.