आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष:पशुधन लसीकरणासाठी केवळ 3 लाख मात्रा,  नागपूर विभागासाठी केली होती अतिरिक्त17 लाख मात्रांची मागणी

नागपूर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संपूर्ण राज्यासह नागपूर विभागातही लम्पी रोगाने पशुधनाला ग्रासले आहे. लसीकरण हा त्यावरील एक उपाय आहे. नागपूर विभागात पशुधन लसीकरणासाठी अतिरिक्त १० लाख लस मात्रांची मागणी करण्यात आली असून त्यापैकी फक्त ३ लाख लसी मिळाल्याची माहिती सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त डाॅ. प्रज्ञा डायगव्हाणे-गुल्हाने यांनी दिली आहे.नागपूर विभागात एकूण पशुधन २० लाख ५५ हजार ४७६ इतके आहे. लम्पीमुळे आतापर्यंत नागपूर जिल्ह्यांत ३ जनावरे मृत्युमुखी पडलेली आहे. विभागात एकूण २५ बाधित गावे असून १५८ बाधित जनावरे आहे. विभागात आजपर्यंत ४१ हजार ६५५ पशुधनाचे लसीकरण झालेले आहे.

विभागात हिंगणा, सावनेर, पारशिवनी, कामठी, नागपूर, मौदा, काटोल, कळमेश्वर, आर्वी, आष्टी, कारंजा, चंद्रपूर, भद्रावती, वरोरा, सावली असे एकूण १५ तालुक्यात लम्पीचा प्रादुर्भाव आहे. नागपूर विभागात ३ लाख १० हजार लसमात्रा मिळालेल्या आहे.असे आहेत उपचार ः या रोगावर विशिष्ट असा उपचार नाही. लक्षणे बघून अँटी इंफ्लेमेटरी, अँटी पायरेटिक,अँटी हिस्टॅमिनिक औषधांचा वापर करावा लागतो. भूक आणि प्रतिकारशक्ती वाढविण्याकरिता खनिज आणि जीवनसत्वयुक्त औषधे द्यावी लागतात. दुय्यम संसर्ग टाळण्याकरता प्रतिजैविकांचा वापर सुद्धा करावा लागू शकतो अशी माहिती कृषी विज्ञान केंद्रातील विषय विशेषज्ञ (पशुचिकित्सा शास्त्र) डॉ. उल्हास गलकाटे यांनी दिली आहे. आजारी जनावराला त्वरित बाजूला करून विलगीकरणात ठेवावे आणि उपचाराकरिता पशुवैद्यकाची मदत घ्यावी, स्वस्थ जनावरांना गोट पॉक्स ही लस टोचून घ्यावी असेही गलकाटे यांनी कळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...